काँग्रेसच्या मीडिया व कम्युनिकेशन कमिटीवर सुरेशचंद्र राजहंस यांची वर्णी.

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

 

मुंबई – लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाची जय्यत तयारी सुरु असून निवडणुकीसाठी विविध विभागांची आवश्यकता असते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची मीडिया आणि कम्युनिकेशन कमिटी जाहीर झाली असून या कमिटीत प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते व मुंबई विभागीय काँग्रेसच्या स्लम विभागाचे अध्यक्ष सुरेशचंद्र राजहंस यांची सदस्यपदी वर्णी लागली आहे.

 

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे जाहीर केलेल्या या कमिटीचे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आहेत तर सुरेशचंद्र राजहंस यांच्यासह १८ जणांची सदस्य म्हणून वर्णी लागलेली आहे. 

काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष आमदार वर्षाताई गायकवाड यांनी आपल्यावर दाखवलेला विश्वास सार्थ करण्याचा प्रयत्न करेन तसेच वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचा एक शिपाई म्हणून नेहमीच तत्परतेने काम करत राहिन, असा विश्वास सुरेशचंद्र राजहंस यांनी व्यक्त केला आहे.

TAGGED:
Share This Article
error: Content is protected !!