वायनाड – लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपने रिंगणात उतरवलेले के सुरेंद्रन यांच्यावर २४२ गुन्हे दाखल आहेत.
पक्षाचे राज्य सरचिटणीस जॉर्ज कुरियन यांनी सांगितले की, 242 पैकी 237 प्रकरणे सबरीमाला आंदोलनाशी संबंधित आहेत. इतर पाच गुन्हे केरळमधील विविध आंदोलनांच्या संदर्भात नोंदवण्यात आले आहेत, असेही ते म्हणाले.