आयपीएल मध्ये फुलेल बुकिधारकांचा मळा!…

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

 

लालसेपोटी सट्टा खेळणाऱ्यांचा होईल उन्हाळा!

सट्टेबाजीला वेळीच आवर घालण्याचे प्रशासनापुढे आव्हान

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

 नांदेड – भारतात क्रिकेटला अनन्यसाधारण महत्त्व असून दरवर्षी जगभरात प्रसिद्ध ठरलेल्या इंडीयन प्रीमियर लीग (आयपीएल) चे सामने भारतात बीसीसीआयच्या नियमनाखली खेळले जातात. मात्र या मैदानी खेळाचे सुद्धा रूपांतर सट्टेबाजीत करण्यात सट्टेबाज,बुकी चालकांनी तसूभरही कमतरता ठेवली नाही. दरवर्षीप्रमाणे आयपीएलची सुरुवात होत असून, आजपासून (22 मार्च) हा सीजन चालणार आहे.

त्यानुसार अवैध व्यावसायिकांची सुध्दा फिल्डिंग तेवढ्याच जोरात पाहायला मिळेल.सामन्यातील खेळाडू,रन,ओव्हर आदी नाना-विध प्रकारांवर सट्टा लावण्याच्या क्लृप्त्या यामध्ये खेळल्या जातात.ऑनलाईन लिंक,बेटिंग ॲप एजंटच्या माध्यमातून तरुण मुलांपर्यंत पोहोचवून हे खेळ खेळले जातात.

       सदरील सट्टेबाजीत तरुणाई बरबाद होत असल्याचे चित्र प्रत्येक गल्लीबोळात दिसत आहेत.चार पैशाची हौस घेऊन अवैध खेळाला बळी पडून अनेक तरुण कर्जबाजारी होत आहेत.याचा विपरीत परिणाम त्यांच्या वैवाहिक जीवनावर पडत आहे.हा सीजन नुकताच सुरू होत असून अशा संभाव्य व्यसनापासून तरुणाई अलिप्त कशी राहील,या ऑनलाईन सट्टेबाजीला आळा घालण्याचे पोलीस प्रशासनापुढे मोठे आव्हान आहे.


     सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे निवडणूक आयोग, विवध प्रशासकीय यंत्रणा कामाला लागल्या आहेत.विशेष म्हणजे मार्च महिना असल्यामुळे मटका दुकाने तात्पुरती बंद असल्याचे ऐकावयास मिळत आहे.


याचप्रमाणे आचारसंहितेदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील यादृष्टीने अवैध व्यवसाय, सट्टेबाजीला पायबंद घालण्याचे आव्हान पोलीस प्रशासन तथा प्रशासकीय यंत्रणेपुढे आहे.

Share This Article
error: Content is protected !!