अर्णव चौडारपवार नवोदय विद्यालयासाठी पात्र धर्माबाद तालुक्यामधून एकमेव विद्यार्थी

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

 

 

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड – जिल्यातील धर्माबाद शहरातील नामांकित ग्रीनफिल्ड नॅशनल स्कुल चा विद्यार्थी अर्णव प्रविण चौडारपवार हा जवाहर नवोदय विद्यालयासाठी पात्र ठरला आहे. 

20 जानेवारी 2024 रोजी जवाहर नवोदय विद्यालयाच्या सहावी वर्गा करिता ह्या निवड चाचणी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.ज्यामध्ये अर्णव ने घवघवीत असे यश संपादन केले आहे. विशेष बाब म्हणजे तो तालुक्यातून फक्त एकटा पात्र ठरला आहे. 

ह्याबद्दल अंकुर अकॅडमी धर्माबाद चे संचालक हांडे राम सर यांचे सुद्धा मोलाचे मार्गदर्शन घडले त्याबद्दल त्यांनी अर्णव प्रवीण चौडारपवार या विद्यार्थ्यासह माता पिता सौ. रुपाली प्रविण चौडारपवार त्यांचा सुद्धा अंकुर अकॅडमी मध्ये हांडे राम सर यांच्या वतीने सन्मान करण्यात आला व तसेच

ग्रीनफिल्ड नॅशनल स्कुल चे संचालक शिवराज पाटील होटाळकर,मुख्याध्यापक शेख खदीर,अजय घाटे,जेष्ठ शिक्षक संतोष इनामदार,जेष्ठ शिक्षिका प्रज्ञा इनामदार,क्रीडा शिक्षक व पत्रकार अहमद लड्डा,आर्शिया खानम,उमडे सर,शिवकुमार गंगोणे,श्रवंती चोळकर,राहुल होरे,विशाल इबितवार,दिगांबर हिंगणे,प्रभाकर भेरजे,गोविंद पवार,पूजा मॅडम,निकीता तायडे आणि आयशा मॅडम यांनी त्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.अर्णव ने हे आपल्या यशाचे श्रेय आपले आई-वडील आणि आपल्या गुरुजन वर्गांना दिले आहे.येथे शहरातून, तालुक्यातून व सर्व स्तरातून अर्णव चे कौतूक होत आहे.

Share This Article
error: Content is protected !!