हदगाव ता.प्रतिनिधी/
हदगाव तालुक्यातील मौजे हडसणी येथील दत्ता पाटील हडसनीकर हे मागील १३ दिवसापासून मराठा समाजाच्या विविध मागण्या करिता व मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण तसेच कोपर्डीच्या ताईच्या मारेकऱ्यांना त्वरित प्रशासन करावे व विविध मागण्याकरिता उपोषण करत आहेत. व तसेच वैद्यकीय आव्हानुसार त्यांची प्रकृती खालवत चालली असून प्रशासनाने त्यांच्या उपोषणाची त्वरित दखल घेऊन त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास दिनांक १७/०७/२०२३ वार सोमवार रोजी संपूर्ण तामसा सह हदगाव व सबंध हदगाव तालुक्यातील मार्केट कडकडीत बंद ठेवण्यात येईल असा इशारा मराठा समाजा तर्फे देण्यात आला आहे ..