माहूर तालुका प्रतिनिधी/बजरंगसिंह हजारी
माहूर :- माहूर तालुक्यातील सायफळ येथून महीला बचत गटाचे वसूल केलेले पैसे 1लाख 22हजार 741 रुपये व टॅब हे आपल्या बॅग मध्ये ठेवुन गोकुळ या गावाकडे जात असलेल्या बचत गटाच्या एका वसूली कर्मचाऱ्यास अनोळखी इसमांनी त्यांचे डोळ्यात लाल मिर्ची पाउडर टाकुन काठीने मारहाण करुन त्यांचेकडील पैसे व टॅब असलेली बॅग जबरीने घेवुन पोबारा केल्याची खळबळजनक घटना दिवसाढवळ्या दि.०3एप्रिल रोजी घडली होती.फिर्यादीने या घटनेची फिर्याद दि.०4 एप्रिल रोजी सिंदखेड पोलिस ठाण्यात दिल्यानंतर अनोळखी इसमांविरुद्ध कलम 394 भादंवीप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.कर्तव्यदक्ष व कार्यतत्पर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत किनगे यांनी अत्यंत जलदगतीने तपासचक्रे फिरवून अवघ्या 48 तासात घटनेत सामिल एका विधीसंघर्षग्रस्त बालकासह एकूण सहा जणांची ओळख पटवून यातील तीन मुख्य आरोपींच्या मुसक्या आवळून आज अटक करण्यात यश मिळविले असून,दोघा फरार आरोपिंचा शोध सूरु आहे.
सिंदखेड पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुशांत किनगे यांनी पोलीस उप निरीक्षक रमेश गिरी, पोहेकॉ पठान,पोहेकॉ सानप,पोकां मोकले,पोकॉं ठाकरे,पोकॉं इंगळे, चालक पोहेकॉ कदम, नापोकॉ सतिष, पोकों शेंडे,नापोकों रघुनाथ मडावी या आपल्या सहकारी पोलिस कर्मचाऱ्यांच्या मदतीने नमुद गुन्ह्याचा तपास करुन व गोपनिय माहीती वरुन आरोपी नामे रोहन पि.दिनेश बनसोड वय 18 वर्ष रा.सायफळ यास ताब्यात घेवुन पोलिसी खाक्या दाखवत त्याचेकडे सखोल तपास केला असता,त्याने व आकाश विष्णु मुरके वय 30 वर्ष, समाधान दता शेंडे वय 31वर्ष,उमेश आंनदराव राउत, करण वसंता शेंडे व एक विधीसंघर्षग्रस्त बालक अशा सहा जणांनी मिळून दि.03 एप्रिल रोजी प्रविण एकनाथराव कवरे मु.पो.पुसदा ता.जि.अमरावती हल्लीमुक्काम माहूर व या महिला बचत गटाच्या वसूली कर्मचाऱ्यास त्याने सायफळ येथे वसूली केलेली महिला बचत गटाचे पैसे 1लाख 22हजार 741घेऊन जमा केलेली रक्कम व टॅब बॅगमध्ये ठेवून
सायफळ येथून गोकुळ या गावाकडे जात असताना सदरील आरोपींनी त्यांचे डोळ्यात लाल मिर्ची पाउडर टाकुन काठीने मारहाण करुन त्यांचेकडील पैसे व टॅब असलेली बॅग जबरीने घेवुन पोबारा केल्याच्या गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.
मुख्य आरोपी रोहन दिनेश बनसोड यांनी दिलेल्या माहीतीवरुन लगेच आरोपी नामे आकाश विष्णु मुरके व समाधान दता शेंडे सर्व राहणार सायफळ ता.माहूर या तिघांना ताब्यात घेवून आज शनिवार दिनांक 06 एप्रिल रोजी सकाळी 09.03 वाजता गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.यातील दोन फरार आरोपी उमेश आंनदाराव राउत,करण वसंता शेंडे यांचा पोलिस शोध घेत आहेत
सदरील गुन्ह्याचा तपास पोलीस अधिक्षक,नांदेड श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलीस अधिक्षक,भोकर खंडेराव धरणे,उपविभागीय पोलीस अधिकारी दादाराव सीनगारे यांचे मार्गदर्शनात सिंदखेड पोलिस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत किनगे यांनी आपल्या सहकारी पोलिस कर्मचाऱ्यांच्या मदतीने अवघ्या 48 तासांच्या आत या घटनेतील आरोपींचा जलदगतीने छडा लावून मुख्य तीन आरोपींच्या मुसक्या आवळन्यात यश मिळवून अटक करुन गुन्हा उघडकीस आणला आहे.त्यामुळे गुन्हा उघडकीस आणलेल्या सपोनि किनगे यांच्यासह सिंदखेड पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांचे सर्वस्तरातून कौतुकासह अभिनंदन करण्यात येत आहे.