आलापल्ली शहर प्रतिनिधी शंकर मुत्येलवार
आलापल्ली – मुलचेरा येथे काँग्रेस कमिटी द्वारा आयोजित इंडिया महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ.नामदेव किरसान यांच्या निवडणुक प्रचारार्थ विरोधी पक्ष नेते विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत सभा पार पडली.यावेळी जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली महेंद्र ब्राम्हणवाडे, अखिल भारतीय रिपब्लिकन पार्टी रोहिदास राऊत, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अतुल गण्यारपवार, समन्वयक अहेरी विधानसभा क्षेत्र अजय कंकडालवार, जिल्हाध्यक्ष परीवहन सेल रुपेश टिकले, जिल्हाध्यक्ष महिला काँग्रेस कमिटी गडचिरोली कविता माहोरकर, जिल्हाध्यक्ष आदिवासी काँग्रेस कमिटी हनुमंत मडावी, जिल्हा उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी शंकरराव सालोटकर, रविभाऊ शहा, तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी मुलचेरा प्रमोद गुट्टेवार, महिला तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी कविता मेश्राम, केशव पाटील तेलामी, केसरी पाटील तलाडी, नामदेव पराते सर्व पक्षाचे पदाधिकारी व तसेच मुलचेरा तालुक्यातील कोपरल्ली विश्वनाथ नगर मलेरा कोठारी कोलपल्ली तुमरगुड दामपूर लगाम सुंदर नगर भगत नगर भवानीपुर मोहरली गांधीनगर लक्ष्मी पूर आंबेला गट्टा देवदा बोलेपल्ली कुद्रमपल्ली गोमणी आंबटपलि हजाराच्या संख्येने कार्यकर्ता उपस्थित होते.अबकी बार काँग्रेस सरकार म्हणून घोषणा देत होते.