महिला प्रदेशाध्यक्षा यांच्या उपस्थितित होणारा मेळावा यशस्वी करा -भास्कर गुंजाळ

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

नाशिक जिल्हा प्रतिनिधी

नाशिक : महिला कॉग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे हया लवकरच नाशिक दौर्यावर येत असुन त्यांच्या उपस्थितीत महिला कॉग्रेसचा मेळावा होणार आहे त्यासाठी सर्व महिला कार्यकर्त्यानी कामाला लागा अशी सूचना महिला कॉग्रेसच्या पदाधिकारी बैठकित कॉग्रेसचे प्रदेश सचिव भास्करराव गुंजाळ यांनी केली महिला कॉग्रेसच्या नवनियुक्त जिल्हाध्यक्षा वंदना पाटील यांनी घेतलेल्या बैठकित अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते यावेलळी व्यासपीठावर इगतपुरी महिला अध्यक्षा मनीषा मालूंजकर,पर्यावरण सेल अध्यक्ष निवृत्ती पा कातोरे,इगतपुरी शहराध्यक्षा सविता पंडित ह्या होत्या

यावेळी २०१३ मध्ये गैस सिलेंडर ३३० रूपयाना भेटूनही केंद्रीय मंत्री स्मृती इराणी हया आंदोलन करत “अब की बार मोदी सरकार” च्या घोषणा देत रस्त्यावर उतरत होत्या मात्र आज हजार रुपयांच्या वर गेलेला गैस असो की गगनाला भिड़लेली महागाई यावर मात्र कोणीही न बोलता फक्त लोकांची घर व पक्ष फोड़न्यात भाजपाई व्यस्त आहेत अशाही परिस्थितित फक्त एक माणुस लोकाना धीर देवुन “डरो मत” असा आशावाद देतोय तो म्हणजे राहुलजी गांधी त्यामुळे ह्या माणसाचे हात बळकट करण्यासाठी महिलानी सज्ज व्हा असे आवाहन गुंजाळ यांनी करतानाच गेल्या चार वर्षानंतर पक्षश्रेष्टिनी महिला अध्यक्षा म्हणून वंदना पाटील यांची नियुक्ती केल्याबद्दल श्रेष्ठींचे आभार मानले या बैठकीसाठी सौ मीनाताई भारस्कर पाटील,सुमन ताई महाले ,निर्मलाताई भातीवल,जाधव ताई इत्यादी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या पाहुण्यांचे स्वागत व आभार प्रदर्शन जनार्दन नेहते साहेब व संतोष राऊत यांनी केले तसेच इमरान अन्सारी यांनी सूत्रसंचालन केले.

TAGGED:
Share This Article
error: Content is protected !!