दिव्यांगांच्या सोयीसाठी भारत निवडणूक आयोगाचे सक्षम ॲप

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

 

हिंगोली जिल्हा प्रतिनिधी/बजरंगसिंह हजारी 

हिंगोली : दिव्यांग मतदारांच्या सोयीसाठी भारत निवडणूक आयोगाने सक्षम ॲपची निर्मिती केली आहे. या ॲपद्वारे दिव्यांग मतदारांना त्यांची मतदार नोंदणी करणे, मतदार यादीत नाव शोधणे, उमेदवारांची माहिती मिळविणे, मतदानासाठी आवश्यक सोयी सुविधांची मागणी करणे तसेच इतर मतदान संबंधित माहिती मिळविण्यासाठी सक्षम ॲपचा उपयोग होणार आहे. 

 

हिंगोली जिल्ह्यातील सर्व दिव्यांग मतदारांनी सक्षम ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करुन मतदानविषयक विविध बाबींचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Share This Article
error: Content is protected !!