निवडणूक खर्चाची तृतीय लेखे तपासणी 23 एप्रिल रोजी

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

 

हिंगोली जिल्हा प्रतिनिधी/बजरंगसिंह हजारी

हिंगोली  – हिंगोली लोकसभा मतदारसंघातून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांची तृतीय निवडणूक खर्च लेखे तपासणी मंगळवार, दि. 23 एप्रिल रोजी होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाठीमागे जिल्हा कोषागार कार्यालय,हिंगोली येथे ही तपासणी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत होणार असून, सर्व उमेदवार अथवा त्यांच्या अधिकृत खर्च प्रतिनिधींनी प्रत्यक्ष उपस्थित राहून तपासणी करून घेण्याचे आवाहन खर्च सनियंत्रण कक्षातर्फे करण्यात आले आहे.

 

15-हिंगोली लोकसभा मतदार संघासाठी निवडणूक खर्च निरीक्षक अन्वर अली व कमलदीप सिंह यांच्या उपस्थितीत ही तपासणी होणार आहे. निवडणूक खर्च सादर करण्यात अपयशी ठरलेले उमेदवार लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 च्या कलम 77 (1) अंतर्गत दंडात्मक कार्यवाहीसाठी पात्र राहतील, असे निवडणूक खर्च सनियंत्रण कक्षातर्फे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

 

Share This Article
error: Content is protected !!