भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नांदेड उत्तर ॲड.अविनाश राठोड यांची नुकसानग्रस्त भागात धाव
तातडीने नुकसानीचे पंचनामे करून मदत देण्याची प्रशासनाकडे मागणी
माहूर तालुका प्रतिनिधी/विजयसिंह हजारी
माहूर: तालुक्यातील मळीतांडा व जुनापाणी येथे काल शुक्रवार 19 एप्रिल रोजी रात्री अचानक आलेल्या प्रचंड वादळी वाऱ्यामुळे अनेक नागरिकांच्या राहत्या घरांची पडझड होऊन व ती जमिनदोस्त झाल्याने प्रचंड नुकसान झाले.परिसरात अचानक कोसळलेल्या नैसर्गिक संकटाची माहिती मिळताच भाजपाचे नांदेड उत्तर जिल्हा उपाध्यक्ष ॲड.अविनाश राठोड यांनी आपल्या सहकारी पदाधिकार्यांसह आपदास्थळी तात्काळ धाव घेत झालेल्या नुकसानीची पाहणी करून तातडीने नुकसानीचे पंचनामे करून मदत देण्याची प्रशासनाकडे मागणी केली.
याप्रसंगी अविनाश राठोड यांच्या सोबत भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप राठोड, तालुका सरचिटणीस अपील बेलखोडे,राज नायक यांच्या सह नुकसानग्रस्त नागरिकांची उपस्थिती होती.