परभणीकर पैशांनी विकले जाऊ शकत नाहीत; हिंमत असेल तर मला संपवून दाखवा – उध्दव ठाकरे 

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

परभणी माझ्या शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे..

 

परभणी: लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रत्येक पक्षाकडून ठिकठिकाणी प्रचार सुरू आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज परभणीत सभा होती. ही सभा सुरू असतानाच वरुणराजा बरसला.

परंतु या कोसळत्या पावसातही उद्धव ठाकरे विरोधकांवर कडाडले. त्यांनी पंतप्रधान मोदींसह भाजपाला धारेवर धरलं. यावेळी ठाकरेंनी आव्हान दिलं की, हिंमत असेल तर उद्धव ठाकरेंना संपवून दाखवा. त्यांच्या या सभेची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. 

मोदी-शहांवर सडकून टीका

परभणी माझ्या शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. तुम्ही सर्व त्याचे सैनिक आहात. भाजपाला असं वाटलं असेल, मिध्यांना असं वाटलं असेल की, सर्व काही पैशांनी विकत घेता येतं. पण परभणीकर पैशांनी विकले जाऊ शकत नाहीत. हे शिवसेना प्रमुखांनी कमवलेलं जे प्रेम आहे ते आशीर्वादाच्या रुपाने माझ्यासमोर बसलं आहे. ही आपली परीक्षा आहे. अरे वादळालासुद्धा अंगावर घ्यायला मर्दाची छाती लागते ती आपल्याकडे आहे. आम्ही पाठीवर वार करत नाहीत. आम्ही वादळाच्याही छातीवर वार करणारे शिवरायांचे मावळे आहोत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

TAGGED:
Share This Article
error: Content is protected !!