पशुसंवर्धन विभागाचे दुसऱ्या श्वेतक्रांतीकडे वाटचाल _पशुसंवर्धन विभागामध्ये होणार मोठे बदल

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

शेतकऱ्यांना मिळणार चांगल्या सुविधा तर बेरोजगार पदविकाधारक यांना मोठ्या प्रमाणात सरकारी नोकरीची संधी – पशुधन विकास अधिकारी उमेश सोनटक्के

हिमायतनगर ता.प्रतिनीधी जरगेवाड बाबाराव

हिमायतनगर – मार्च महिन्यामध्ये पशुसंवर्धन विभागाने खात्यामध्ये मोठ्या बदलांसाठी विभागाची पुनर्रचना करून विभाग हा अधिकाधिक पशुपालकाभिमुख केला असून त्यात मोठ्या प्रमाणात बदल केले आहे या बदलांमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांसाठी दर्जेदार सुविधा, औषधी , रोग निदानाच्या सुविधा, विविध योजना उपलब्ध होणारा असून जनावरांच्या आरोग्यावरील व व्यवस्थापना वरील तसेच कृत्रिम रेतनावरील खर्च कमी होऊन दूध उत्पादन वाढून दूध धंदा किफायतशीर होण्यास मदत होणार असून यातून नविन उद्योजक तयार होणार आहेत. तसेच नवीन रचनेत प्रत्येक दवाखाना हा पदवी धारक यांच्या अधिपत्याखाली येऊन त्यांच्या मदतीला पदविकाधारक उपलब्ध करून देण्यात आले आहे त्यामुळे 3000 पदविकाधारक यांना कायमस्वरूपी नोकरीची संधी उपलब्ध होणारा असून एम पी डब्ल्यू व मैत्री अंतर्गत प्रत्येक गावात दोन पदविकाधारक यांना कंत्राटी नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे म्हणजेच जवळजवळ 60 ते 70 हजार पदविका धारक यांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे त्यामुळे त्यांच्याही सरकारी नोकरीचे स्वप्न साकार होणार आहे. सदर पुनर्रचनेमुळे सर्वात जास्त फायदा हा पशुपालक यांचा होणारा असून त्यामुळे नक्कीच दुसरी श्वेतक्रांती होऊन दूध व्यायसायात अमुलाग्र बदल होणार आहे त्यामुळे पशुपालक चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे

Share This Article
error: Content is protected !!