शरीराविरुध्दचे सतत गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारास एमपीडीए कायद्या अंतर्गत एक वर्षा करीता केले स्थानबध्द

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

हिंगोली जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

हिंगोली -मा.पोलीस अधीक्षक,हिंगोली यांनी पाठविलेल्या प्रस्ताव नुसार मा. जिल्हाधिकारी हिंगोली यांनी काढले 42 व्या कार्यवाहीचे आदेश .
मा.पोलीस अधीक्षक,जी. श्रीधर यांनी हिंगोली यांनी जिल्हयातील सराईत गुन्हेगार व सतत गुन्हे करणाऱ्या विरुध्द कडक कार्यवाहीची भुमिका घेवुन अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या आरोपीची इत्यंभूत माहिती वरूण ते करत असलेल्या गुन्हयांना प्रतिबंध करण्यासाठी त्यांच्या विरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा, फौजदारी प्रक्रीया संहिता व एम.पी.डी.ए.कायद्या अंतर्गत प्रभावी प्रतिबंधात्मक कार्यवाही केली जात आहे. धोकादायक इसम नामे श्री रोहन आनंदराव लबडे वय २९ वर्ष रा.आंबेडकर नगर हिंगोली ता.जि.हिंगोली यांचेवर मागील अनेक वर्षापासून हिंगोली येथील पो.स्टे. हिंगोली शहर येथे गंभीर स्वरुपाचे शरीराविरुध्दचे एकुण बारा (१२) गुन्हे दाखल असून तो सतत गुन्हे करीत होता.

 

तो समाजासाठी धोकादायक बनला होता. त्याचे कृत्यामुळे परिसरातील नागरीकांमध्ये भितीचे व असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती.तो गंभीर स्वरुपाचे दखलपात्र गुन्हे करीत असल्याने सामाजिक स्वास्थ्यास व सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा पोहोचविणारा धोकादायक इसम बनला होता.म्हणून मा. पोलीस अधीक्षक,यांचे आदेशाने सदर प्रकरण विजय गणपत राठोड सहायक पोलीस निरीक्षक, पो.स्टे. हिंगोली ग्रामीण यांनी मारोती थोरात,उपविभागीय पोलीस अधिकारी,उपविभाग बसमत पदभार हिंगोली ग्रामीण यांच्या मार्फतीने नमुद इसमा विरुध्द कार्यवाहीचा प्रस्ताव मा. पोलीस अधीक्षक, जी.श्रीधर यांच्या कडे सादर केला होता.

मा.पोलीस अधीक्षक, हिंगोली यांनी सदर प्रस्ताव मा. जिल्हाधिकारी,हिंगोली यांच्या कडे पाठविला होता.मा. जिल्हाधिकारी,हिंगोली श्री जितेंद्र पापळकर यांनी सदर प्रस्तावाची सविस्तर पडताळणी करुन सदरील नमुद धोकादायक इसमा विरूध एम.पी.डी.ए. १९८१ (सुधारणा १९९६,२००९ आणि २०१५) कलम ३ (२) अन्वये एक वर्षाकरीता कारागृहात स्थानबध्दतेचे आदेश निर्गमीत केले असुन पुढील कार्यवाही सुरु आहे.

Share This Article
error: Content is protected !!