सिरंजनी येथील मलेश्वर दोंतूलवाड यांचा मुलगा बनला जिल्हा परिषद शिक्षक

कष्टाला आले फळ

aia anand
2 Min Read
Spread the love

 

ईश्वर दोंतुलवाड यांनी प्रतिकूल परिस्थितीत ही मिळवले यश

हिमायतनगर  / बाबाराव जरगेवाड 
तालुक्यातील मौजे सिरंजनी येथील अत्यंत हलाखीच्या परिस्थितीचा सामना करत हातावर आपलं पोट भरत आपला घर संसार सांभाळणारे ईश्वर यांचे कुटुंब आहे.याच कुटुंबातील ईश्वर यांनी आपल्या जिद्दीच्या आणि मेहनतीच्या बळावर यश खेचून आणले आहे. त्यांची रायगड येथे जिल्हा परिषद शिक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे.त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरावरून अभिनंदन केले जात आहे.

याविषयी सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील सिरंजनी या गावात मलेश्वर दोंतूलवाड हे आपल्या कुटुंबाचे काबाड कष्ट करून आपला गुजारा करतात. अत्यंत हलकीच्या परिस्थितीचा सामना त्यांना करावा लागला. त्यांचा मुलगा ईश्वर यांनी शिक्षक भरती मध्ये घवघवीत यश संपादन केले आहे.यामुळे दोंतुलवाड कुटुंबाच्या आनंदास पारावार उरला नाही. कारण एवढ्या बिकट परिस्थितीशी सामना करत ईश्वर ने हे यश त्याच्या जिद्दीने, मेहनतीने खेचून आणले आहे.

 

ईश्वर दोंतुलवाड यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा सिरंजनी येथे झाले. यानंतर त्यांना शिकवण्याची आवडत असल्याने त्यांनी नांदेड येथे शिक्षण घेतले.यानंतर त्यांनी काही वर्ष शिकवणी वर्ग घेतले. व काही वर्ष संस्थेवर शिकवले. त्यांना घरच्या परिस्थितीची जाण असल्याने काम करत करत शिक्षण घेतले.अत्यंत बिकट परीस्थितीचा सामना करत दिवस काढले. त्यांचे लग्न होऊन वर्ष झाले व ईश्वर यांनी माझा छोटा भाऊ परमेश्वर मूळे मला यश मिळाले असे मनोगत व्यक्त केले. लहान्या भावाने त्यांना शिक्षणासाठी हवे नको ते सर्व केले.प्रत्येक वेळी अडीअडचणीत मदत केली.यामुळेच मी इथपर्यंत पोहचू शकलो. माझ्या सर्व यशाचे श्रेय हे केवळ माझा लहान भाऊ परमेश्वर व माझे आई वडील यांनाच आहे.असे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी सांगितले.
त्यांच्या यशाबद्दल सिरंजनी येथील सर्व दोंतूलवाड परिवार, सिरंजनी येथील शाळेतील शिक्षकवृंद,पत्रकार बाबाराव जरगेवाड, पत्रकार परमेश्वर गोपतवाड,पत्रकार नागेश शिंदे गंगाधर गायकवाड, लोकस्वराज्य आंदोलन चे जिल्हाध्यक्ष धोंडोपंत बनसोडे, युवा ग्रामीण पत्रकार संघाचे तालुकाअध्यक्ष विजय वाठोरे सरसमकर,गोल्ला गोलेवार समाज संघटना ता.अध्यक्ष सुभाष शिलेवाड,परवत काईतवाड , अभिषेक बकेवाड,बाबु करेवाड,बालाजी मँकलवाड, निरंजन मँकलवाड,नागनाथ शिलेवाड,पोतना करेवाड यांच्यासह अनेकांनी शुभेच्छा देत अभिनंदन केले आहे.

Share This Article
error: Content is protected !!