पालघर जिल्हा प्रतिनिधी/
पालघर : पालघर जिल्ह्यातील सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तसेच प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 22/07/2023 रोजी पर्यंत पालघर जिल्ह्याला अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. याचा विचार करता, पालघर जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळा व महाविद्यालये यांना दिनांक 22/07/2023 रोजी जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी सुट्टी जाहीर केली आहे.
पालघर जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी सर्व सरकारी व खाजगी शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका व महानगरपालिका शाळा अनुदानित व विनाअनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, निवासी आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये व आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्रे यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था यांना दिनांक 22/07/2023 रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी जाहीर केली आहे.
पालघर जिल्ह्यातील शाळांना उद्या सुट्टी जाहीर – जिल्हाधिकारी गोविंद बोडके