सरपंचाच्या दुर्लक्षामुळे विकासापासून वंचित
धर्माबाद : प्रतिनिधी /
धर्माबाद तालुक्यातील सिरजखोड,रामपूर आणि रामेश्वर या तीन गावांची मिळून एक गट ग्रामपंचायत आहे.मात्र सिरजखोडची लोकसंख्या १८८३ असून या गावातुन सर्वाधिक नऊ सदस्य निवडले जातात.परिणामी कोणत्याही विकासयोजना आल्या की, त्या सिरजखोड मध्येच राबविल्या जात असल्याचा आरोप रामपूर व रामेश्वर येथिल नागरिक करीत आहेत.
मुंबई ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ कलम,५ अन्वये प्रत्येक गावासाठी एक ग्रामपंचायतीची तरतूद आहे. ही त्यासाठी गावाची लोकसंख्या किमान ६०० इतकी असावी लागते.मात्र रामूपरची लोकसंख्या २६८ आणि रामेश्वर १५१ आहे. त्यामुळे अशा गावासाठी गट ग्रामपंचायतीची तरतूद आहे.त्यामुळे सिरजखोड ग्रामपंचायतीला हे दोन्ही गाव जोडले गेले आहेत.
सिरजखोड,रामपुर आणि रामेश्वर हे तिन्ही गाव गोदावरीच्या तीरावर वसलेले होते. मात्र सातत्याने येणाऱ्या पुरापासून सुरक्षित राहावे यासाठी १९८१ ला ह्यांचे पुनर्वसन झाले.
त्यानंतर सिरजखोड ह्या गावांनी विविध कामाचा निधी गावात खर्च करून घेतला मात्र रामपूर रामेश्वर ह्या गावात कुठलीच सुविधा उपलब्ध नाहीत. रामपुर व रामेश्वर हे ह्या ग्रामपंचायतीच्या वार्ड क्रं 3 मध्ये येतात.गावाच सरपंचपदही हे नेहमी सिरजखोड येथील नागरिकांनीच भूषविले असून यावेळी मात्र सरपंच मिर्झा गफार बेग मिर्झा जाफर बेग हे रामपुर आणि रामेश्वर(वार्ड क्रं. ३) मधून निवडून आले. त्यांना निवडूण आणणन्यात नारायण पाटील पवार व शेख फेरोज यांनी सिंहाचा वाटा उचलला. कारण सरपंचांनी निवडणूकीत भला मोठा वचननामा दिला होता. ह्या वचननाम्याची पूर्ती झाली असती तर निश्चित या गावांचा फायदा झाला असता.मात्र सरपंच बेग यांनी वचननाम्यातील एकही काम मार्गी लावलेल नाही.गावात
साधे पथदिवे सुध्दा बसवले नाहीत. पावसाळ्याच्या दिवसात अनेक समस्याना सामोरं जावं लागत आहे. यामुळे येथील नागरिकांमध्ये विद्यमान सरपंचा विरोधात रोष दिसून येत आहे.
धर्माबाद तालुक्यांतील सिरजखोड पंचायत समिती गणातील ही सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे.मात्र येथील सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या हलगर्जीपणाचा फटका रामपुर आणि रामेश्वर वासियांना बसत आहे.
मात्र येणाऱ्याकळात त्यांनाही याची किंमत मोजावी लागेल.
नारायण पा. पवार
रामपूर