घाबरलेले सरकार  घोषणाबाजी करत असून येत्या दोन- तीन महिन्यांत चंद्र-तारे देवू म्हणतील – जयंत पाटील 

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

जिल्हा प्रतिनिधी/

सांगली : घाबरलेले सरकार सवंग लोकप्रियतेसाठी घोषणाबाजी करत असून येत्या दोन- तीन महिन्यांत चंद्र-तारे देवू म्हणतील, असा उपरोधिक टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी लगावला.

 

इस्लामपूर येथे राष्ट्रवादी असंघटीत बांधकाम कामगार शरदचंद्र पवार पक्षाच्या वाळवा तालुका, इस्लामपूर शहर व आष्टा शहराच्या वतीने २ हजार कष्टकरी कुटुंबांना भांडी संच वाटप करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रतिक पाटील, सुभाषराव सुर्यवंशी, पक्षाचे शहराध्यक्ष शहाजी पाटील, नेर्ल्यांचे सरपंच संजय पाटील, पैलवान भगवान पाटील, संदीप पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Share This Article
error: Content is protected !!