एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला.
उमरी तालुका प्रतिनिधी/
उमरी. तालुक्यातील हातनी या गावातील विद्यार्थी गावापासून जवळ असलेल्या बळेगाव येथील शाळेत सर्व विद्यार्थी शिक्षणासाठी रोज ऑटो रिक्षाने जात असतात. विद्यार्थ्यांना घेऊन जात असलेल्या ऑटो रिक्षाच्या समोर अचानक हरीण आले त्या हरणाला वाचण्याच्या प्रयत्नात ऑटो रिक्षाचा अपघात झाला .या अपघातात एका विद्यार्थ्याचा जागी मृत्यू झाला आहे,तर एक विद्यार्थी गंभीर जखमी असून इतर चार विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. उमरी तालुक्यातील हातनी फाटा येथे सदरचा अपघात घडला असून उमरी तालुक्यातील हातनी या गावातील विद्यार्थी आहेत. गावापासून जवळ असलेले बळेगाव येथील शाळेत सर्व विद्यार्थी शिक्षणासाठी रोज ऑटो रिक्षाने जात असतात आज देखील नेहमीप्रमाणे विद्यार्थी रिक्षाने जात असताना बळेगाव ते हातनी रस्त्यावर असलेल्या हातनी फाटा येथे अचानक ऑटो च्या समोर शेतातून वेगाने धावत असलेला हरीण अचानक आला आहे हे हरीण रिक्षाला थडकल्याने रिक्षाचा अपघात झाला .ऑटो रिक्षा पलटी होऊन झालेल्या अपघातात एक विद्यार्थी जागेच ठार झाला अन्य एक गंभीर जखमी झाला असून इतर चार विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत रिक्षा पलटी झाल्याने समाजात समजतात परिसरातील नागरिकांनी मदत साठी धाव घेतली त्यानंतर सर्व जखमी विद्यार्थ्यांना उमरी आणि नांदेडच्या शासकीय रुग्णालयासाठी दाखल करण्यात आले आहे. ह्या घटनेची माहिती गावात कळताच सर्व हळहळ व्यक्त करत आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अंकुश माने पोलीस उपनिरीक्षक मुक्ती राम चेवले आदींनी अपघात स्थळी भेट देऊन पंचनामा केला .सदर तालुक्यातील अवैध वाहतुकीला आळा घालून संबंधित प्रशासन कारवाई करून बस सेवा वेळेवर चालू करावे असे परिसरातील जनतेकडून बोलले जात आहे.