प्रेमीयुगुलांचे धर्माबादच्या परिसरात रेल्वे समोर उडी घेऊन केली आत्महत्या

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

 

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड – जिल्यातील धर्माबाद शहारा लागत २ नं रेल्वे गेट जवळ “उमरी तालुक्यातील नागठाणा येथून कारेगाव मार्ग प्रेमीयुगुल धर्माबादला दुचाकी, घेऊन गुरुवारी धर्माबादला रात्री आले साईनाथ अशोक चंदापुरे वय २४ रा. नागठाणा) आणि सविता माधव होळगावे‌ वय १९ रा.नागठाणा) अशी मृतकांची नावे आहेत धर्माबाद परिसरात तरुण-तरुणीचा मृतदेह रेल्वे पटरी वर सापडला आहे ते बुधवारी रात्री (दि. १८) दुचाकीने (एम. एच. २६एकजे ५९८२) या दोघांचेही एकमेकांवर प्रेम होते. मात्र, कुटुंबीयांचा लग्नाला विरोध होता. 

त्यांनी एकत्र आयुष्याच्या आणाभाका घेतल्या होत्या.मात्र,लग्न शक्य नसल्याचे बघून त्यांनी जगाचा निरोप घेण्याचा निर्णय घेऊन आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज धर्माबाद पोलिसांनी व्यक्त केला आहे.

धर्माबाद रेल्वे क्रॉसिंगजवळ ही घटना घडली असून मृतांच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी शवागृहात हलवण्यात आले आहेत.”दोघांचेही मृतदेहाचे शवविच्छेदन डॉक्टर मुनेश्वर सह आरोग्य कर्मचारी प्रकाश कांबळे,गणेश टोंम्पे,मारोती यांनी करून पोलीसांच्या मार्फत मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले दोन्ही मृतदेह एकमेकांना लागूनच होते.मृत्य अवस्थेत मृतदेह मिळून आले.केवळ लग्नाला विरोध झाल्यामुळे एका सुखद प्रेमाचा दु:खद अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

धर्माबाद पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गायकवाड,पवार विठ्ठल सुपारे रमेश घेवारे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. 

 धर्माबाद ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक गायकवाड यांनी ‘दैनीक हिंदूसम्राट प्रतिनिधी ’ला ही माहिती दिली. धर्माबाद पोलिसांनी (AD३९) आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलिस सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड साहेब करत आहेत.

Share This Article
error: Content is protected !!