देगलूरात अतिक्रमण धारकांना मोठा दणका

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

 

देगलूर प्रतिनिधी ,नागेश पलपवार

देगलूर – नगरपालिकेने शहरातील अतिक्रमण हटवायची मोहीम अखेर हाती घेतली असून आज दिनांक 26 जुलै 2024 रोजी देगलूर शहरातील मुख्य बाजारातील विविध ठिकाणी पोलीस बंदोबस्तामध्ये जेसीबीच्या साह्याने अतिक्रमण हटवून अतिक्रमण धारकांना मोठा दणका दिल्यामुळे अखेर बाजारपेठेतील रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे, त्यामुळे वाहनधारकासह पादचाऱ्यामधून आनंद व्यक्त केला जात आहे.

तत्पूर्वी काही अतिक्रमण धारकांनी अतिक्रमण करून आपला व्यवसाय थाटला होता, त्यामुळे मुख्य बाजारपेठतील भाजीपाला मार्केट, सराफा मार्केट , लोहिया मैदान व इतर वर्दळीच्या ठिकाणी जाणाऱ्या येणाऱ्या वाहनास व पादचाऱ्यास वारंवार अडथळा निर्माण होत होता, त्यामुळे दैनिक चालू वार्ता पेपरच्या माध्यमातून नगरपरिषदेच्या प्रशासनास लक्षात आणून दिली होती. त्यामुळे नगरपरिषद प्रशासनाने वारंवार अतिक्रमण धारकांना तोंडी सूचना देऊनही सदरील अतिक्रमण काढून घेत नसल्यामुळे नगरपरिषद प्रशासनाने ठोस भूमिका घेत दि.२६ जुलै २०२४ रोज जेसीबी मशीनच्या सहाय्याने व पोलीस बंदोबस्तात सदरील अतिक्रमण हटविले. त्यामुळे शहरातील सराफा मार्केट भाजी मार्केट व लोहिया मैदान असे विविध ठिकाणचे रस्ते मोकळा श्वास घेतल्याचे दिसून येत आहे.

 

त्यावेळी देगलूर चे तहसीलदार राजाभाऊ कदम ,नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तानाजी चव्हाण, देगलूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वास झुंजारे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण हटाव पथक देगलूर येथील अतिक्रमण हटवले या कामगिरीमुळे देगलूर शहरातील नागरिका मध्ये आनंदाचे वातावरण असल्याचे दिसून आले .

Share This Article
error: Content is protected !!