नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी शरदचंद्र महाविद्यालय सज्ज.

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

 

 नायगाव तालुका प्रतिनिधी/अशोक वाघमारे 

नायगाव – येथील शरदचंद्र महाविद्यालयामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के. हरीबाबू यांनी पत्रकार परिषद घेऊन नवीन शैक्षणिक धोरणाची सविस्तर माहीती दिली. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये कौशल्यावर आधारीत अभ्यासक्रमाची आखणी केली असल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे.पदवीचे शिक्षण हे आता चार वर्षाचे असून पहिल्या वर्षी सर्टिफिकीटचे प्रमाणपत्र मिळेल, दुसऱ्या वर्षी डिप्लोमा प्रमाणपत्र मिळेल, तिसऱ्या वर्षी डिग्रीचे प्रमाणपत्र मिळेल तर चौथ्या वर्षी ऑनर्स प्रमाणपत्र दिले जाते पण या चार वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमात एखाद्या वर्षी विद्यार्थ्याने गॅप केल्यास कोणतेही नुकसान त्याचे होत नाही त्या त्या वर्षाचे प्रमाणपत्र मिळाल्याने माझे शिक्षण अर्ध्यावरच थांबले असे होत नाही याशिवाय कला शाखेतील विद्यार्थी कॉमर्स व सायन्स शाखेतील कोणताही विषय घेऊन शिक्षण घेऊ शकतो तसेच बाहेरच्या विद्यापीठातील एखादा विषय घेऊन अभ्यास जरी केला तरीही त्या विषयाचे क्रेडीट त्यांच्या नावावर जमा होतात अशा पद्धतीने सविस्तर मार्गदर्शन प्राचार्य डॉ.हरीबाबू यांनी करून पत्रकारांनी उपस्थित केलेल्या शंकेचे निरासनदेखील अतिशय सोप्या पध्दतीने केले. नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी महाविद्यालय पूर्णपणे तयारी केल्याचेही त्यांनी सांगितले. महाविद्यालयामध्ये नवीन सुविधा ज्यामध्ये सोलार युनिट, फिल्टर पाण्याचे मशिन, कम्प्यूटर्स, फॅन्स, बेंचेस, रंगरंगोटी, स्वच्छता अशा अनेक बाबीबरोबरच सर्टीफिकेट कोर्सेस, एमओयू, नवीन विषयाची सुरुवात, संशोधन केंद्र सुरू करून नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणीसाठी आमचे महाविद्यालय सज्ज असल्याचे सांगितले.

 

     उपप्राचार्य डॉ. शाम पाटील यांची विशेष उपस्थिती होती. सर्टीफिकेट कोर्सपैकी मास मेडिया, जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशन पुर्ण केलेल्या विद्यार्थ्याना जेष्ठ पत्रकाराच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.यावेळी अनेक वर्तमानपत्राचे पत्रकार, इलेट्रॉनिक माध्यमाचे प्रतिनिधी उपस्थित होते.विशेषतः भा. ग. मोरे, वहाबोद्दीन शेख, सुर्यकांत सोनखेडकर, प्रभाकर लखपत्रेवार, रघुनाथ सोनकांबळे. संपादक डॉ. शंकर गड्डमवार, संपादक प्रकाश हणमंते, दिलीप वाघमारे.लक्ष्मण बरगे .रामप्रसाद चन्नावार. माधव चव्हाण, आरीफ शेख, शंकर बोईनवाड, बाळासाहेब पांडे. गंगाधर गंगासागरे. माधव बैलकवाड,मेडीयाचे प्रतिनिधी तानाजी शेळगावकर, शेषराव कंधारे. गोविंद नरसीकर.हणमंत चंदनकर. मधुकर जवळे. शिवाजी कुंटूरकर. गणेश कंदूरके. प्रल्हाद भंडारे . निळकंठ जाधव.यांच्यासह 31 प्रतिनिधी उपस्थित होते. या परिषदेचे प्रास्ताविक प्रा.डॉ. प्रकाश हिवराळे यांनी केले तर आभास नॅकचे समन्वयक डॉ. वैभव कवडे यांनी मानले.परिषद यशस्वीतेसाठी ग्रंथपाल डॉ. भरत लोकलवार, डॉ अमित पांडे, उमेश चव्हाण , बालाजी काळे, देविदास भाकरे यांनी परिश्रम घेतले.

Share This Article
error: Content is protected !!