ता.प्रतिनीधी/हिमायतनगर
हिमायतनगर/ मा. सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयच्या निर्देशानुसार मा. सर्वोच्य न्यायालय दिल्ली, मा उब न्यायालय मुंबई विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्याचे आदेशीत करण्यात आल्याने तसेच नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधीकरण नांदेड व तालुका विधी सेवा समिती हिमायतनगर यांच्या विद्वमानाने हिमायतनगर न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे दिनांक 27/07/2024 रोजी आयोजन करण्यात आले होते. त्याअनुषंगाने सदरील लोकन्यायालयामध्ये दिवाणी स्वरुपाचे एकुण दावे 105 ठेवण्यात आले होते त्यापैकी 12 दावे निकाली निघाले तर फौजदारी स्वरुपाचे एकुण 143 प्रकरणापैकी 28 प्रकरणे निकाली निघुन 411400/- रु ची वसुली झालेली आहे.
दाखल पूर्व एकुण खटले 1549 ठेवण्यात आलेले होते त्यापैकी एकुण 81 प्रकरणे निकाली निघुन 4286300/- रक्कमेची वसुली झालेली आहे.
सदरील लोकन्यायालय यशस्वी करण्यासाठी दिवाणी न्यायाधिश क.स्तर, हिमायतनगर तथा तालुका विधी सेवा समिती चे अध्यक्ष श्री कि, रा. खोंद्रे साहेब तसेच तालुका अभिवक्ता संघ, महिला सरंक्षण अधिकारी, पोस्टे हिमायतनगर, बैंक कर्मचारी तसेच न्यायालयाचे सहा अधिक्षक पांचाळ साहेब, जंगीलवाड साहेब, बारसे साहेब, भारत राठोड व गंगाधर मगरे व इतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.
अध्येक्ष,
तालुका विधी सेवा समिती हिमायतनगर