नायगाव तहसील कार्यालयामध्ये महसूल सप्ताह 2024 चे आयोजन. मा तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांची माहिती

abhishek bakkewad
3 Min Read
Spread the love

 

नायगाव ता प्रतिनिधी/अशोक वाघमारे

नायगाव – दरवर्षीप्रमाणे दिनांक 1 ऑगस्ट 2024 हा महसूल दिन म्हणून साजरा संपूर्ण राज्यांमध्ये करण्यात यावा या अनुषंगाने शासनाने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत तालुका स्तरावर तहसील कार्यालयाच्या माध्यमातून महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार आहे.

 

सदर महसूल सप्ताहाचे आयोजन दिनांक 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान राज्यभरात महसूल सप्ताह 2024 साजरा करण्यात येणार असून त्याच अनुषंगाने नायगाव तहसील कार्यालयामध्ये देखील सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार आहे. तर सप्त्याहा मध्ये प्रत्येक दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत समाजाच्या विविध घटकातील नागरिकांसाठी पुढील प्रमाणे विशेष मोहीम/ कार्यक्रम/ उपक्रम/ शिबिरे /महसूल अदालत यांचे येणार असून सदर महसूल सत्याची कार्यक्रमाचे रूपरेषा देखील ठरविण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. दिनांक 1 ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा करणे व महसूल सप्ताह शुभारंभ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, दोन ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना, तीन ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, चार ऑगस्ट रोजी स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय, पाच ऑगस्ट रोजी सैनिक हो तुमच्यासाठी, सहा ऑगस्ट रोजी एक हात मदतीचा दिव्यांगाच्या कल्याणाचा, आणि सात ऑगस्ट रोजी महसूल संवर्गातील कार्यरत सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी संवाद उत्कृष्ट अधिकारी कर्मचारी पुरस्कार वितरण व महसूल सप्ताह सांगता समारंभ अशा विविध उपक्रमांनी महसूल सप्ताह साजरा होणार असून यामध्ये नागरिकांच्या कल्याणकारी योजना शिबिरे व लोकहितांचे मार्गदर्शन शिबिरे, महसूल प्रशासनाच्या माध्यमातून होत असलेल्या अडचणी दूर करण्याकरता विशेष मार्गदर्शन व त्यासाठी उपाय योजना यासह तहसील कार्यालया अंतर्गत मिळणाऱ्या शासकीय योजना सामाजिक उपाय योजना व जनतेच्या हिताकरिता अत्यावश्यक कागदपत्रांची निकाली काढून जनतेला शासनाच्या विविध योजनांचा लाभ होण्याकरिता विशेष मोहीम आणि विशेषतः महाराष्ट्र सरकारने घालून दिलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण माझी योजनासाठी एकूण तालुक्यातील 24381 ऑनलाइन पद्धतीने अर्ज तहसील कार्यालय मला प्राप्त झाले असून या योजनेसाठी शासनाच्या वतीने एक समिती विस्थापन करणार असल्याची देखील माहिती मा तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांनी दिली आहे सदर समितीत जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी, माननीय तहसीलदार, माननीय गटविकास अधिकारी, व अंगणवाडी सेविका यांचा देखील सहभाग असणार आहे या समितीच्या माध्यमातून लाडके बहीण योजनेसाठी प्राप्त झालेल्या अर्जातून व अर्जाची छाननी करून मंजुरीसाठी प्रस्ताव वरिष्ठाकडे पाठविण्यात येणार असल्याची खात्रीलायक माहिती देखील मा तहसीलदार धनप्रिया गायकवाड यांनी दिली आहे. सदर सप्ताह साठी तालुक्यातील सर्व अधिकारी कर्मचारी नागरिक यासह उपस्थित राहण्याचे आवाहन देखील तहसीलदार धम्म प्रिया गायकवाड यांच्या कडून करण्यात आले आहे.

Share This Article
error: Content is protected !!