नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड – स्वातंत्र काळा पासून महाराष्ट्र,तेलगाणा, कर्नाटक राज्याला जाण्यासाठी सर्वत मोठी बाजारपेठ असलेल्या नायगावला बस्थानक नव्हते पण अलीकडंच्या काळात सदरील शहरात शिक्षणासाठी राज्यातून विध्यार्थी विधाथीर्नी उच्चशिक्षणासाठी शहरातील शिक्षण संस्थेत दाखल होत आहे त.
गेल्या अनेक वर्षांपासून सातत्यपूर्ण नायगाव बसस्थानकासाठी पाठपुरावा करीत अखेर महाव्यवस्थापक बांधकाम महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ मुंबई दिनेशजी महाजन यांची गजानन पाटील चव्हाण यांनी बसस्थानक साठी भेट घेऊन प्रस्तावाची अंतीम मंजुरी घेतली*
दिनांक 31 /07/ 2024 रोजी महाव्यवस्थापक बांधकाम म रा म परिवहन मंडळ मुंबई दिनेशजी महाजण यांना दिनांक 17 एप्रिल 2024 रोजी जिल्हा वाहतूक नियंत्रण अधिकारी अर्थात डी.सी.नांदेड यांचे कडून गजानन पाटील चव्हाण यांच्या पाठपुराव्याने प्रस्ताव पाठवण्यात आला होता.
त्यावरून या प्रस्तावित प्रस्तावव्यास नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे.
नायगाव शहर हे महाराष्ट्र आंध्रप्रदेश व तेलंगणा कर्नाटक येथून येथील व्यापारी पेठेत येणारे सामान्य नागरिक, शाळा कॉलेज व उच्चं शिक्षणासाठी येणारे विध्यार्थी,वैधकीय दवाखान्यासाठी येणारे वयोवृध ज्येष्ठ सामान्य नागरिक तसेच बँक महसूल तहसीलच्या कामा निमित्ताने ये जा करणाऱ्यां सामान्य शेतकऱ्यांना वाहतुकीसाठी येथे बसस्थानक नसल्याने नेहमीच या सर्वांना निवाऱ्यासाठी त्रास सहन करावा लागत होता.
यामुळे येथील महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या बस्थानकाची समस्या गंभीर बनलेली असताना नायगावं येथील नायगाव विधानसभा मतदारसंघाचे युवा नेतृत्व तथा सामाजिक कार्यकर्ते माजी नगरसेवक प्रतिनिधी गजानन पाटील चव्हाण यांच्या मागील अनेक वर्षाच्या प्रयत्नाला अखेर यश मिळाले.आज मुंबई येथे महाराष्ट्र परिवहन महामंडळाचे महाव्यवस्थापक यांची भेट घेऊन मागील अनेक दिवसापासून करण्यात आलेल्या सर्व घडामोडीचा तपशील त्यांच्या समोर सादर केला असता महाव्यवस्थपक साहेबांकडून या संदर्भातील कर्मचाऱ्यां सोबत चर्चा करून हा प्रश्न लगेच संबंधितांना आदेश दिले आहेत.
अर्थात सूचित करण्यात आले यामुळे नायगाव येथे येणाऱ्या हजारो लो नागरिकांकरीता सुखद व आनंदाची बातमी ठरणार आहे..नायगाव शहरातील बस्थानाकाची फाईल झेड संदर्भाच्या स्पीडने काम चालू करण्यात आले आहे तसेच लवकरच प्रश्न मार्गी लागण्याचे आश्वासन देण्यात आले असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते तथा भाजप शहराध्यक्ष गजानन चव्हाण यांनी दिली आहे.