नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड – उपविभागीय कार्यालयात कार्यरत असलेले तलाठी श्रीमती अष्टुरे दिपाली हिमगिरे यांना महसूल पंधरवड्यात नुकताच जिल्हाधिकारी माननीय अभिजीत राऊत, श्रीमती मेघना कावली मॅडम प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी .श्रीमती मिनल करनवाल मॅडम मुख्य कार्यकारी अधिकारी नांदेड,म निवासी उपजिल्हाधिकारी श्री महेश वडदकर साहेब , अप्पर जिल्हाधिकारी श्री पी. एस. बोरगावकर साहेब उपविभागीय अधिकारी श्रीमती स्वाती दाभाडे मॅडम यांच्या उपस्थितीत उत्कृष्ट तलाठी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .
गेल्या अनेक वर्षापासून महसूल विभागाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे जनसामान्यापर्यंत पोहोचण्यात काम तलाठी मॅडम करतात. तलाठी पदावर कार्यरत असताना नैसर्गिक आपत्ती , ई -फेरफार ,पांदन रस्ते ,पी -एम किसान योजना ,तलावातून गाळ काढणे त्यासोबतच राशन कार्ड ,श्रावण बाळ दिव्यांग ,विधवा आधीच्या योजना प्रभावीपणे कॅम्प लावून सोडवलेले आहे.आपण समाजाचे काही देणे आहे या उद्देशाने शेतकरी खातेदाराप्रती आस्था व प्रेम बाळगून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मदतीने प्रशासनात आपल्या कार्याचा ठसा प्रभावीपणे उमटविला आहे.
आजतागायत जारिकोट, चिकना, येताळा ,येवती सझाचे काम प्रभावीपणे केलेले आहे. दरवर्षी शंभर टक्के महसूली उद्दिष्ट पुर्ण करणे,सोबतच पीक कापणी प्रयोग शासनाच्या वतीने दिले जाणारे विविध अग्रीम रक्कम शेतकऱ्यांना मिळवून देणे ही कामे तंतोतंत पुढाकाराने नेहमीच पार पडतात. त्याच्यीच पावती म्हणून त्यांना उत्कृष्ट तलाठी पुरस्कारासाठी उपविभागीय अधिकारी सौ.स्वाती दाभाडे मॅडम यांनी त्यांच्या नावाची शिफारस वरिष्ठ कार्यालयाकडे केलेली होती.
उत्कृष्ट तलाठी पुरस्काराने सन्मानित केल्यामुळे उपविभागीय अधिकारी स्वाती दाभाडे मॅडम,तहसीलदार श्री महिंद्रकर साहेब,नायब तहसीलदार श्री इंदुरकर साहेब श्री गावंडे साहेब,मंडळ अधिकारी तलाठी व कर्मचाऱ्यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केलेले आहे.
महसुली कार्य करीत असताना साहित्य क्षेत्रात ही त्यांचे चांगले योगदान असून लवकरच त्यांचा कूस पहिला कविता संग्रह वाचकांच्या भेटीला येणार आहे.
कवयित्री तलाठी श्रीमती दिपाली अष्टुरे(हिमगिरे)ह्या हुतात्मा पानसरे प्राथमिक शाळेत कार्यरत असलेले उपक्रमशील शिक्षक विठ्ठल हिमगिरे यांच्या सौभाग्यवती असून त्यांचा मिळालेल्या पुरस्काराबद्दल राजकीय,सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रातून,शेतकरी, पत्रकार बांधवाकडून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.त्यांना मिळालेले पुरस्कार ही त्यांच्या खऱ्या अर्थाने कामाची पावती आहे.