नायगाव चा प्रतिनिधी/अशोक वाघमारे
नायगाव : किनाळा येथून जवळ असलेल्या मौजे टाकळी (बु ) ता नायगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत निकृष्ट व मनमानी रस्त्याला जाणीवपूर्वक मागासवर्गीयांची हक्काची जागा रस्त्यासाठी वापरणाऱ्या कंत्राटदारांच्या निषेधार्थ व गावातील विविध मागण्याच्या करिता भारतीय लहुजी सेना प्रमुख व्ही.जी. रेडी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली गावातील शिवाजी विठ्ठलराव रेड्डी, व पारूबाई विठ्ठलराव रेड्डी हे दोघेही भर पावसामध्ये आमरण उपोषण दिनांक 20 जुलै रोजी सकाळी दहा वाजल्यापासून बेमुदत आमरण उपोषणाला बसले असून आज चौथा दिवस असूनही याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. यात उपोषणार्थी महिलेची तब्येत खालावली असून याकडे प्रशासन मात्र जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहेत
यातील सविस्तर माहिती अशी की टाकळी बु येथे सुरू असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत रोडच्या कामात रोड साठी दोन्ही बाजूने रोडच्या मधोमध दोन्ही बाजूने समान जागा रोड साठी न घेता मागासवर्गीय यांच्या वस्ती असलेल्या बाजूने रोड साठी जागा जास्तीची घेऊन मागासवर्गीयांवर व त्यांच्या कुटुंबावर मोठा अन्याय करणाऱ्या कंट्रकदारांच्या मनमानी कारभारांची चौकशी करून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा व इतर रोडच्या दोन्ही बाजूला गटारांचे पाणी जाण्यासाठी नाला बांधून पाईप लाईन टाकलीच पाहिजे ग्रामपंचायतचे मागील 15 वर्षाचे एडिट रिपोर्टर दिलेच पाहिजे मागासवर्गीय यांच्या शेतकऱ्यांच्या शेतात वीर व बोर मंजूर केलेली यादी मिळाली पाहिजे सदर दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत केलेल्या कामांचा आढावा दिला पाहिजे प्रत्येक घराला पिण्याचे पाण्याचे नळ मिळाले पाहिजे दलित वस्तीतील समाज मंदिरांच्या एकूण जागेचा क्षेत्रफळ मिळाला पाहिजे मागासवर्गीय समाजातील घर व दुकान यांची घरपट्टी मिळाली पाहिजे रस्त्याचे काम करणाऱ्या कंट्रकदारांची चौकशी करून त्यावर कारवाई झाली पाहिजे दलितांची जमीन बळकावणाऱ्या कंट्रकधारावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात यावा अशा विविध मागण्या मान्य करून घेण्यासाठी भारतीय लहुजी सेनेचे प्रमुख व्ही जी रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली टाकळी बु येथे दिनांक 20 जुलै पासून उपोषणाला बसले आहे.
सदरील उपोषणाचा चौथा दिवस उलटून देखील प्रशासनाकडून साधी भेट देखील दिली नाही दिनांक 20 व 21 जुलै रोजी टाकळी परिसरात पाऊसाने थैमान घातले असल्याने नदी नाले यांना मोठा महापूर आल्याचे दिसून येत आहे या ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने या भागातील अनेक शेतकऱ्यांची शेती ही पाण्याखाली खरडून गेली आहे शेकडो हेक्टर जमीन ही पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यावरती शासनाने त्वरित लक्ष देऊन पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव मदत करावी अशी मागणी आता येथील शेतकऱ्यांची होताना दिसून येत आहे आणि उपोषण करते कुठल्याच अधिकाऱ्याने भेट किंवा समस्या जाणून न घेतल्याने उपोषण करते यांनी संताप व्यक्त केला आहे. आमच्या मागण्या व आम्हाला न्याय वेळेवर मिळाला नाहीतर आम्ही ही तक्रार वरिष्ठाकडे करून योग्य तो न्यायाच्या प्रतिक्षेत राहू अशी ही भावना व्यक्त केली आहे…,