सरसगट पंचनामे करून आर्थिक मदत द्या-तालुक्यातील शेतक-यांची तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

 

उमरी प्रतिनिधी उद्धव मामडे

उमरी:-सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात तालुक्यात मोठ्याप्रमाणात अतिवृष्टी झाली.शेतकऱ्यांचे सरसगट पिके नष्ट झाले.त्यात वरील धरणात शंभर टक्के भरल्याने गोदावरी नदीतून पाणी पोचमपाड धरणात सोडावे लागले.त्यामध्ये गोदावरी नदी ओव्हरफूल होऊन गोदाकाठावरील शेतकऱ्याच्या शेतात घुसून सरसगट पिके खरडून गेले.होत्याचे नव्हते झाले.अतिवृष्टीमुळे चिबाड रानातले पिके पाण्याने पिवळे पडून नष्ठ झाले.राहिलेल्या सोयाबीन व कापूस पिकांवर यलोमोज्या रोग पडल्याने सोयाबीन व कापूस पिके सह इतर पिके ही गेल्यात गिनती आहे. तरी शासनाने.मंञिमंडळाची बैठक ओरंगाबाद येथे घेऊन विशेष पॅकेज मंजूर करावे, दरवर्षी येणाऱ्या पुराची पूर रेषा कायम करून शेतक-यांना हेक्टरी दोन लक्ष रुपये अनुदान देऊन विशेष कायदा करावा, सरसगट पंचनामे करा.ई पिक पहाणी अट रद्द करा, २०२३ ते २०२४ मधील दुष्काळी अनुदान वाटप करा.२०२४ते २०२५ मधील शंभर टक्के विमा मंजूर करा,ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना रब्बी पेरणी साठी हेक्टरी पन्नास हजार द्या.

नॅशनल बँकेकडून हेक्टरी अडिच लाख वाटप करा. जनावरांना चारासाठी छावण्या उभारा.शेतक-यांना दरडोई दहा हजार रुपयांपर्यंत राशन व औषधी उपचारासाठी तात्काळ द्या, असे वरील मागण्या मान्य न झाल्यास गोदाकाठच्या पट्ट्यातील बाधीत गावातील शेतकरी १८ सप्टेंबर पासून महादेव मंदीर बोळसा गंगा पट्टी येथे साखळी उपोषणास बसणार आहे.याची प्रशासनानी नोंद घ्यावी.या उपोषणास बोळसा ग.प, रहाटी खुर्द, इळेगाव, कुदळा,मनुर, इजतगांव, बळेगाव, अब्दुलापुर वाडी,अमदापूर,दिलावरपूर, बिजेगाव,बितनाळ,हातनी,बेलदारा,मियादपूरवाडी या गावातील पूरग्रस्त शेतकऱ्यांचे उपोषण सूरू झाले आहे.उपोषण शातंतेत करण्यात येणार आहे.हे उपोषण सकाळी अकरा ते पाच पर्यंत राहिल.सदर निवेदन उमरी तहसीलदार मार्फत जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंञी,पालकमंञी,पोलीस आधिक्षक यांना सादर करण्यात यावे असे जिल्हा शेतकरी जनआंदोलन संघर्ष समितीचे अध्यक्ष डॉ भगवान मनूरकर, उपाध्यक्ष जगन शेंळके,शिरिषराव देशमुख गोरठेकर, संदिप पाटील कवळे,प्रल्हाद पाटील इज्जतगावकर, बालाजी पाटील बितनाळकर,आनंदराव यल्मगोडे, व्यंकटराव पाटील कवळे,बापुराव पाटील ढगे, यासह तालुक्यातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

TAGGED:
Share This Article
error: Content is protected !!