१५ एकरात पाणीच पाणी ! सरकार जगु की मरु ! सुरेश बोरकर या शेतकऱ्याचा टाहो. 

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

ढाणकी /प्रतिनिधी :मनोज राहुलवाड

ढाणकी : पासून जवळच असलेल्या कृष्णापूर येथील शेतकरी, सुरेश दादाराव बोरकर यांच्या शेत सर्वे १०७/१,२,३, ४ मधील जवळपास १५ एकर जमिनीमध्ये, अतिवृष्टीच्या पावसाने संपूर्ण पाणीच पाणी झाले. यामुळे संपूर्ण पीक खरडून गेले असून, सदर शेतकरी कुटुंबाची जगण्याची आशाच माळवली आहे. पिरंजी ते ढाणकी वाहणाऱ्या नाल्याच्या शेजारी त्यांचे शेत असून, त्या नाल्याच्या महापुराच्या कचाट्यात यांचे शेत अडकले. आणि त्यांच्या जवळपास संपूर्ण जमिनीवर पाण्याने ताबा घेतला. कसंतरी पीक फुललं होतं म्हणून शेतकरी राजा समाधानी होता. पण अतिवृष्टीने पंधरा एकरात पाणी झाल्यामुळे, आम्ही जगाव की मरावं? असा सवाल सुरेश बोरकर करीत आहेत. सरकारने आमच्या दुःखाची जाणीव समजुन घेऊन, आम्हाला लवकरात लवकर न्याय द्यावा. पंचनामे कधी होणार? सर्वे कधी होणार? आणि नुकसान भरपाई कधी भेटणार? या विवंचनेत सुरेश दादाराव बोरकर सापडले आहेत. खरंच शासन व प्रशासन तातडीने त्यांना मदत करणार का?अवघ्या दोनच दिवसात, उभं पीक होत्याचं नव्हतं झालं. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका गोरगरीब शेतकरी दरवर्षी सहन करतो. खरंच सरकारने तातडीने अशा शेतकऱ्यांकडे गांभीर्यपूर्वक लक्ष द्यावं. अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी करताना दिसत आहेत.

Share This Article
error: Content is protected !!