नायगाव ता. प्रतिनिधी/अशोक वाघमारे
नायगाव : तालुक्यातील हुस्सा येथील गेले 40 वर्ष असलेली मागणी आता पुर्ण झाली आहे. नांदेड ते हुस्सा लाल परी सुरु झाल्याने हुस्सा, धनंज, मेळगाव , सांगवी, कुंटूर, कोकलेगाव, शेळगाव येथील प्रवासी समाधान व्यक्त केले आहे. आणि नांदेड ते हुस्सा बस गाडीचे रोडवरील सर्व गावांनी जिथे तिथे गाडी थांबवून गाडीचे स्वागत केले आहे त्याच बरोबर हुस्सा येथे सरपंच प्रतिनिधी श्री रमेश पाटील हंबर्डे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या उत्साहात चालक व वाहक यांचे जंगी स्वागत करण्यात आहे आहे.
हुस्सा येथील वाहना अभावी नांदेडला जाण्यासाठी गैरसोयी होत होती आणि मोठा खटाटोप करावा लागत होता पण ही बससेवा सुरु झाल्याने शाळकरू विधार्थी, जेष्ठ नागरिक, महिला , व व्यापारी यांच्या अडचणी दूर झाल्याचे सांगण्यात येत आहे. विशेषतः प्रवशामध्ये संतोषचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. ही बससेवा हुस्सा येथील माजी उपसरपंच तथा भाजप युवा मोर्च्याचे जिल्हासरचिटणीस श्री बाबासाहेब पाटील हंबर्डे यांच्या प्रयत्नाने व नायगाव विधासभेचे कर्तव्यदक्ष, कार्यसम्राट, आमदार यांच्या पाठपुराव्या मुळे आज पासून लाल परी हुस्सा दारीं चे आगमन झाले आहे.
सदर बससेवा नांदेड ते हुस्सा चालू झाल्याने यातून 8-10 गावांना प्रवासाना फायदा होणार आहे. आणि त्यांच्या प्रवास सुखकर होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ही बससेवा गेले अनेक वर्षांपासून रस्तामुळे येत नव्हती पण आमदार पवार यांच्या प्रयत्नाने सांगवी,मेळगाव, धनंज, हुस्सा राहेर साठी कोठ्यावाधीचा निधी मिळाल्याने रस्त्याचे काम सोयीस्कर झाल्याने ही बस सेवा सुरु झाली आहे.
आज बसचा पहिला दिवस असल्याने बसचे चालक एम आर मुळे व वाहक एन पी परगेवार, यांनी ही बस नांदेड ते हुस्सा पर्यंत आणून प्रवाशांना समाधान केले आहे. म्हणून हुस्सा येतील नागरिकांनी श्री बाबासाहेब पाटील हंबर्डे व आमदार श्री राजेश पवार आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे आभार मानले आहे. उपस्थित कार्यक्रमाला हुस्सा येतील सरपंच प्रतिनिधी श्री रमेश पाटील हंबर्डे, शरद पाटील हंबर्डे, बाबू पाटील हंबर्डे अशोक पाटील हंबर्डे गणपती पाटील डोईफोडे राजेश पाटील, नितीन पाटील, बालाजी पाटील, गोविंद पाटील,उत्तमराव जालनेकर, शेख रसूलसाब,साहेब शंकर वाघमारे, गणपत वाघमारे,अवधूत महाराज, अन्य गावातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
लाल परी हुस्सा च्या दारीं प्रवासाच्या सोयी साठी नांदेड ते हुस्सा बस सेवा सुरु…….