शिरीषभाऊ देशमुख गोरठेकर यांच्या जनसंपर्क दौऱ्यास वाढत्या पाठिंब्याने निवडणुकीत आणली रंगत!

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

उमरी तालुका प्रतिनिधी:-उद्धव मामडे

उमरी:-नायगाव विधानसभा निवडणुक अवघ्या काही दिवसावर येवून ठेपली आहे.नायगाव विधानसभा मतदार संघात निवडणूक लढवण्यासाठी महाविकास आघाडीकडे इच्छुकांची गर्दी वाढल्याने ऐनवेळी उमेदवार जाहिर होणार असल्याची माहिती आहे. उमेदवारी मिळवण्यासाठी साठी इच्छुकानी तगडी फिल्डिंग लावली आहे. यामुळे महाविकास आघाडीची उमेदवारी कोणाला मिळणार हे अगामी काळात समजेल. 

शिरीषभाऊ देशमुख गोरठेकर यांच्या माध्यमातून उच्चविभुषीत तरूण चेहरा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट देणार असल्याच्या चर्चा आहेत. शिरीषभाऊ गोरठेकर यांनी जनसंपर्क दौरा काढत अख्खा नायगाव मतदार संघ पिंजून काढत आहेत या जनसंपर्क दौऱ्यास गावकुसातील नागरिकांकडून मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळत असून रात्री 11 वाजेपर्यंत गावकूसातील नागरिक शिरीषभाऊ गोरठेकर यांची वाट पाहत असून ठीक ठिकाणी जोरदार स्वागत होत आहे यामुळे शिरीषभाऊ देशमुख यांनी नायगाव विधानसभा मतदार संघातील निवडणुक रंगात आणली आहे.

 लोकसभा निवडणुकी अगोदर महाविकास आघाडीची उमेदवारी घ्यायलासुद्धा कोणी पुढे येत नव्हते परंतु महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत जनतेनी दिलेल्या साथीमुळे विजय प्राप्त झाल्याने महाविकास आघाडीकडे आज गर्दीच गर्दी पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीच्या वतीने जिंकण्यासाठी अनेकांनी खा.शरदचंद्र पवार, उद्धव ठाकरे व काँगे्रस नेत्यांकडे रांगा लावल्या आहेत. नायगाव विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून शिरीषभाऊ देशमुख यांना असणार आहे. त्यामुळे मतदारसंघातून अनेक नेते हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट यांच्या दिशेने जात आहेत.नायगाव मतदार संघाच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांना पराभूत करण्यासाठी सद्य स्थितीला शिरीषभाऊ देशमुख गोरठेकर या एकमेव प्रभावी प्रतिस्पर्धी म्हणून समोर येत आहेत. नायगाव,धर्माबाद उमरी मतदार संघातील गावामध्ये गोरठेकर बंधु च्या जनसंवाद यात्रेला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.

TAGGED:
Share This Article
error: Content is protected !!