महाराष्ट्रात 9 कोटी 63 लाख मतदार …
मुंबई – निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला निवडणूक होणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.
महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. तर झारखंडमध्ये 13 आणि 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबरलाच निकाल लागणार आहे. झारखंडमध्ये दोन टप्प्यात निवडणुका होणार आहेत.
आज 15 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांसाठी पत्रकार परिषद घेत असल्याचं निवडणूक आयोगानं पत्रक प्रसिद्ध केलं आहे.
महाराष्ट्रात विधानसभेच्या किती जागा आहेत?
महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत, त्यापैकी बहुमतासाठी 145 जागा आवश्यक आहेत. 2019 च्या निवडणुकीत भाजपला 105, शिवसेनेला 56, राष्ट्रवादीला 54, काँग्रेसला 44 आणि इतरांना 29 जागा मिळाल्या होत्या.