लातूर मधील महावितरण परिमंडळ कार्यालयास आग फर्निचर सह कागदपत्राची जळून राख

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

पण फायबरच्या खुर्च्या जळल्या नाहीत हे मात्र नवलाच

जिल्हा विशेष प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

लातूर शहरातील जुने पॉवर हाऊस परिसरात असलेल्या महावितरण परिमंडळ कार्यालयाला मध्यरात्री दोन ते अडीचच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली.या आगीमध्ये सर्व फर्निचर,सिलिंग पीयुपी, संगणक,प्रिंटर तसेच काही दस्तऐवज जळून खाक झाला आहे.

प्रथमदर्शनी शॉर्ट सर्कीट होवून आग लागली असावी असा अंदाज आहे.मध्यरात्री दोनच्या सुमारास सुरक्षा रक्षकाला परिमंडळ कार्यालयाच्या खिडकीतून धूर येत असल्याचे निदर्शनास आले.पाहता पाहता आग भडकल्याने सर्व खिडक्यामधून आगीचे लोट बाहेर पडत होते.

तत्काळ याबाबत अग्निशमन व गांधीचौक पोलिस ठाण्यास आग लागल्याची माहिती दिली. अग्निशमन दलाची गाडी व पोलीस अधिका-यांनी दखल घेत त्वरीत घटनास्थळी भेट दिली.जवळपास ४-५ तास आग विझवण्यास लागले.आग एवढ्या मोठ्याप्रमाणावर होती की आग विझवण्यासाठी अग्निषमन दलाच्या चार गाड्या पाणी लागले.आग विझेपर्यंत सर्व फर्निचर,२५-३० संगणके, प्रिंटर जळाले होते.

परिमंडळ कार्यालयात मानव संसाधन विभाग, पायाभूत आराखडा,तांत्रिक विभाग, औद्योगिक संबंध विभाग,लैखा व वित्त विभाग,विधी कार्यालय कार्यरत आहेत.याच इमारतीत मुख्य अभियंता व मानव संसाधन विभागाचे सहायक महाव्यवस्थापक यांचे दालन आहेत.या आगीमध्ये सर्वात जास्त हानी मानव संसाधन विभागाची झाली आहे.यामध्ये कर्मचा-यांसंबंधीत असलेली दैनंदिन कागदपत्रे,दररोजच्या कामासाठी लागणारी स्टेशनरी तसेच काही जुने रेकॉर्ड जळाले आहेत.पण फायबर च्या खुर्च्या जळाल्या नाहीत हे मात्र नवलाच म्हणावं लागेल.

लोखंडी कपाटात असलेली कागदपत्रे,सर्व्हिस बुक मात्र सुरक्षीत राहीली आहेत. महावितरणचे संपुर्ण कामकाज हे ऑनलाईन झाले असल्याने व दरमहा सर्व बॅकअप घेण्याची व्यवस्था असल्यामुळे सर्व रेकॉर्ड सुरक्षीत आहे.

 त्याचबरोबर आयटी तज्ञांच्या मतानुसार संगणकातील हार्ड ड्राईव्ह सुरक्षीत असल्याने त्यामधील डाटा परत मिळवणे शक्य आहे.मात्र सर्व विभागाचे फर्निचर,सिलींगचे पीओपी, जळालेली संगणके,असे मिळून अंदाजे ८० ते ८५ लाख रूपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.मालमत्ते शिवाय या आगी मध्ये दुसरे कुठलेही नुकसान झालेले नाही.

परिमंडळ कार्यालयाचे दैनंदिन काम पुर्ववत सुरू रहावे यासाठी पर्यायी जागेची पाहणी केली जात असून तीन चार दिवसात परिमंडळाचे कामकाज पुर्ववत सुरू होईल.

TAGGED:
Share This Article
error: Content is protected !!