१२ उमेदवारांनी घेतली मघार
विशेष प्रतिनिधी माहू/रबजरंगसिंह हजारी
माहूर : 083किनवट/माहूर विधानसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी ३० ऑक्टोबर रोजी ३१ पैकी दोन उमेदवार अवैध ठरविण्यात आल्यानंतर छाननी अंती २९ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते.
उमेदवारी अर्ज माघे घेण्याच्या सोमवार दि.४ नोव्हेंबर या शेवटच्या दिवशी त्यापैकी १२ उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र माघे घेतल्याने आता एकूण १७ उमेदवार हे किनवट/माहूर विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी रिंगणात राहिले आहेत.
निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची नावे..व पक्ष ….
मान्यताप्राप्त राष्ट्रीय आणि राज्य राजकीय पक्षांचे उमेदवार गंगाधर मल्लाजी सरपे( बहुजन समाज पार्टी), जाधव प्रदीप नाईक ( राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,शरदचंद्र पवार), भीमराव रामजी केराम ( भारतीय जनता पार्टी ), नोंदणीकृत राजकीय पक्षांचे उमेदवार (मान्यताप्राप्त राष्ट्रीय आणि राज्य राजकीय पक्षांव्यतिरिक्त)
अशोक संभाजीराव ढोले ( रिपब्लिकन पक्ष (खोरिपा), डॉ.आमले पुंडलिक गोमाजी ( वंचित बहुजन आघाडी), एस. इम्रान अली ( इंडियन नॅशनल लीग ), गोविंद सांबन्ना जेठेवार ( राष्ट्रिय समाज पक्ष),
इतर (अपक्ष) उमेदवार.. जयवंत केसर पवार,जाधव सचिन माधवराव (नाईक),जितेंद्र अनिलराव कुलसंगे,दिलीप धर्मसिंग जाधव नाईक ,धावरे राजेश नारायण,ॲड. प्रदिप देवा राठोड,विजय काशिनाथ खुपसे,शेख फय्याजोद्दीन फकरोद्दीन, संदिप निखाते, संदीप पाटील कऱ्हाळे
या १७ उमेदवारांचा समावेश आहे.तर उमेदवारी माघारी घेतलेल्या मध्ये. धरमसिंग दगडू राठोड,अडकीणे संतोष माधव, बेबीताई प्रदीप जाधव,जाधव सपना सचिन (नाईक),यादव लिंबाजी जाधव,
संध्या प्रफुल राठोड,डॉ. दत्ता मारूती धनवे,अर्जुन किसन आडे,किशन विठ्ठलराव मिराशे,किशन दामा राठोड,विश्वनाथ खंडू कदम,स. शफियोद्दीन स. करिमोद्दीन या १२ जणांचा समावेश आहे.
अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट मेघना कावली यांच्या स्वाक्षरीने निर्गमित पत्रकान्वये डॉ.शारदा चौंडेकर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार किनवट, किशोर यादव सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार माहूर यांनी दिली आहे.
किनवट विधानसभेत चौरंगी लढत होण्याची शक्यता
गत २००४,२००९ व २०१४ अशा तीनही विधानसभा निवडणुकीत
राष्ट्रवादीचे (तत्कालीन) उमेदवार प्रदीप नाईक यांनी किनवट/माहूर विधानसभा मतदारसंघात अठरापगड जातीसह बहुसंख्येने असलेल्या स्वसमाज बंजारा मतांच्या धृविकरणाच्या आधारावर विजयाची हॅटट्रिक साधली होती.तर गत २०१९ विधानसभा निवडणुकीत अठरापगड जातीसह, ओबीसी व बंजारा समाजाच्या तोडीसतोड समसमान असलेल्या आदिवासी जमातींच्या गलेगठ्ठ मतांच्या जोरावर भीमराव केराम यांनी दणदणीत विजय मिळवत प्रदीप नाईक यांना राजकीय मतांची धुळ चारत त्यांचे सलग चौथ्यांदा विजयी होण्याचे स्वप्न भंग केले होते.अर्थातच आपापल्या जातीय मतांच्या समीकरणावर विजय मिळवत आमदारकीवर प्रभुत्व गाजवणारे विद्यमान आमदार भीमराव केराम विरुद्ध माजी आमदार प्रदीप नाईक या दोन मातब्बर पारंपारिक प्रतिस्पर्धीमध्येच या वेळेसही २०२४ किनवट विधानसभा निवडणुकीत सरळसरळ दुहेरी लढत होणार असा राजकीय निरीक्षकांकडून अंदाज बांधण्यात येत होता.मात्र सचिन नाईक मित्रमंडळाकडून अपक्ष म्हणून सचिन नाईक जाधव या उदयोन्मुख बंजारा समाजातील उमेदवाराने व आधी वंचित बहुजन आघाडी कडून तिकीट जाहीर करण्यात येऊन ऐणवेळी तिकीट कापण्यात आल्यानंतरही विजय खुपसे या आदिवासी जमातींच्या उमेदवाराने अपक्ष उमेदवारी अर्ज भरुन दोघांनाही आपला उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने आता ही किनवट विधानसभेत चौरंगी लढत होण्याची शक्यता राजकीय निरीक्षकांकडून वर्तविण्यात येत आहे.
कारण, अपक्ष उमेदवार सचिन नाईक व विजय खुपसे यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवत आज भल्याभल्या राजकीय जाणकारांचे हे दोघेही आपापली उमेदवारी मागे घेतील हे भाकित खोटे ठरवले आहे. महायुतीचे तगडे उमेदवार भीमराव केराम यांच्याआदिवासी जमातींच्या मतांची नवखे अपक्ष आदिवासी उमेदवार विजय खुपसे तर लढवय्ये उमेदवार प्रदीप नाईक यांच्या बंजारा समाजातील मतांची नवखे अपक्ष उमेदवार सचिन नाईक हे मतांचे ध्रुवीकरण रोखून मतांची विभागणी प्रस्थापितांना धक्का देत स्वत:च्या फायद्यासाठी करुन घेतील कि, “विजयश्री (निवडणुकीतील विजय) तू मेरी नहीं बन सकती तो किसी और की भी नहीं” असा राजकीय विचार करत मी नाही तर माझ्यासमाजातीलही नको म्हणत तिसऱ्याचाच फायदा करून देतील असेही राजकीय वजाबाकीचे ठोकताळे बांधले जात आहेत.