जिल्हा प्रतिनिधी/गोविंद चिखलवाड
नांदेड /उमरी – मुदखेड रोडवर दुचाकींची समोरासमोर धडक लागून एक ठार झाल्याची घटना काल शनिवारी रोजी घडली आसुन.सदरील घटना हि मुदखेड उमरी रोडवर इंग्लिश स्कूलच्या शेजारी हा अपघात झाला त्यात एका गरीब कुटुंबातील कर्ता व्यक्ती दुसऱ्यांच्या चुकीमुळे आज गमावला गेला आहे दुसऱ्या गाडीवाल्याने दारूच्या नशेमध्ये रॉंग साईडने येऊन यांच्या गाडीला समोरासमोर धडक मारून साहेबराव गंगाधर नरवाडे राहणार कळगाव तालुका उमरी हे जागीच ठार झाले असून त्यांच्या पत्नी चा पाय मोडला व मुलीला सुद्धा खूप जबरदस्त मार आहे आणि ह्या कुटुंबात हा एकटा कर्ता होता यांना कोणी भाऊ वगैरे नाहीत आणि घरामध्ये वयोवृद्ध आहे दोन मुली आणि ती बेडवर आहे ते त्यांची पत्नी एवढाच परिवार आहे आज हे संकट त्यांच्या घरावर फार मोठ पडलेला आहे ह्या परिवारास बाईला व मुलीला दवाखानात दाखवण्याकरिता जास्तीचे पैसे लागत आहे त्याकरिता माणुसकीच्या नात्याने आपल्याला जी काही मदत करता येईल ती मदत करावी आपल्या थोड्याशा मदतीमुळे ह्या कुटुंबाच चांगलं कल्याण होईल रस्त्यावर आलेले कुटुंब तुमच्या मदतीमुळे सावरण्यात येईल असं आव्हान त्यांच्या मित्रांनी केले आहे.