84 हादगाव विधानसभा मतदारसंघात माधव पाटील देवसरकर यांना स्फूर्त प्रतिसाद.

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

अभिषेक बकेवाड/
हिमायतनगर – 84 हादगाव  विधानसभा मतदारसंघाचे माधवराव पाटील देवसरकर हे स्वराज्य पक्षाचे  पुरस्कृत उमेदवार‌ यांनी दि.५ नोव्हेंबर २०२४ रोजी श्री.दत्तात्रय देवस्थान दत्तबर्डी येथून प्रचारास सुरुवात केली आहे, यापूर्वीच त्यांनी हादगाव आपला मतदारसंघ पिंजून काढला होता. पक्षाची उमेदवारी अधिकृत जाहीर झाल्यानंतर मोठ्या जोमाने प्रचारास सुरुवात केली आहे.

माधवराव पाटील देवसरकर यांना स्वराज्य पक्षाचे  उमेदवारी दिल्याने संपूर्ण मतदारसंघात सहानुभूतीची लाट आली हादगाव  विधानसभेच्या निवडणुकीत दिग्गज उमेदवारांना देवसरकर यांचे मोठे आव्हान मानलं जातं आहे.

दत्तबर्डी देवस्थान येथे प्रचाराचे नारळ फोडताना प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला, यावेळी शेकडो कार्यकर्ते सोबत होते, 84 हादगाव विधानसभा मतदारसंघात स्फूर्त स्वराज्य पक्षमय वातावरण दिसून आले आहे.

Share This Article
error: Content is protected !!