शिवराज पाटील होटाळकर व गोरठेकर बंधू यांची निवडणुकीत माघार घेतल्याने नायगाव मतदारसंघात तिरंगी लढत होणार…..

abhishek bakkewad
5 Min Read
Spread the love

 

 नांदेड प्रतिनिधी/ अशोक वाघमारे

नांदेड – नायगाव मतदारसंघात निवडणुकीची रणधुमाळी सुरू होताच यामध्ये अनेक दिग्गज मंडळीने होउ घातलेल्या निवडणुकीसाठी कंबर कसली होती आणि विधानसभा निवडणुकीमध्ये नायगाव विधानसभेमध्ये अनेक दिग्गज मंडळींनी नामांकन अर्ज दाखल केले होते. हे नामांकन अर्ज भरल्याने नायगाव मतदारसंघांमध्ये सर्वसामान्य मतदार बांधवांमध्ये संभ्रमावस्था पसरल्याचे दिसून आले होते मात्र आज उमेदवारी माघार घेण्याची शेवटची तारीख असल्याने यामध्ये दोन दिग्गज मंडळींनी माघारी असून यात मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक म्हणून ओळखले जाणारे शिवराज पाटील होटाळकर तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शिरीष देशमुख व कैलास देशमुख या बंधूनी नामांकन अर्ज दाखल केले होते मात्र पक्षाच्या काही आदेशामुळे हे नाम

        सदर निवडणुकीमध्ये भाजपा महायुतीकडून आमदार राजेश पवार यांना दुसऱ्यांदा संधी देऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. तर दुसरीकडे काँग्रेसकडून एका महिलेला संधी देऊन डॉक्टर मिनलताई खतगावकर यांना संधी देण्यात आली आहे. डॉक्टर मिनलताई खतगावकर हे उच्चशिक्षित असून नायगाव मतदारसंघांमध्ये चांगला जनसंपर्क आहे. आणि भास्करराव पाटील खतगावकर यांचा देखील मोठ्या प्रमाणात जनसंपर्क असल्याने या ठिकाणी निश्चितपणे काँग्रेसला फायदा होण्याची शक्यता मानली जात आहे. म्हणून काँग्रेस कडून डॉक्टर मिनलताई खतगावकर यांना एक महिला चेहरा म्हणून उतरण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडी कडून डॉक्टर महादेव विभुते यांना संधी देण्यात आले आहे. डॉक्टर माधव विभुते हे लिंगायत समाजाचे असून नायगाव मतदारसंघांमध्ये लिंगायत समाजाचे मताधिक्य मोठ्या प्रमाणात असल्याने समाजाचा विचार करून लिंगायत चेहरा म्हणून वंचित बहुजन आघाडी कडून माधव विभुते यांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये तिरंगी लढत अगदी चुरशीची होणार हे मात्र निश्चित आहे. नायगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये दोन तगडे उमेदवार असून यात आमदार राजेश पवार यांनी गेले पाच वर्ष पासून आमदार म्हणून कार्यरत आहेत. म्हणून त्यांचा जनसंपर्क काही प्रमाणात असून मात्र आमदार राजेश पवार यांच्या एक कलमी कार्यकर्मामुळे भाजप मधील नाराज गटांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. यामुळे आमदार राजेश पवार यांना नक्कीच धक्का तंत्र असल्याचे देखील मतदार संघातील जनसामान्याकडून प्रतिक्रिया येताना दिसून येत आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस महाविकास आघाडीच्या माध्यमातून हो घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्याची जुळवा जुळव करून मोठी कार्यकर्त्यांची शक्ती उभारून आणि विधानसभा मतदार संघामध्ये मोठ्या प्रमाणात काँग्रेस महाविकास आघाडीचे मताधिक्य असल्याने याचाच फायदा काँग्रेसला होण्याची दाट शक्यता मानली जात आहे. तर वंचित बहुजन आघाडी कडून डॉक्टर महादेव विभुते यांना उमेदवारी देऊन लिंगायत समाजाचे मताचा योग्य वापर आणि दलित समाजाचे मताधिक्य यांच्यात गणित जुळवा जुळवा करून डॉक्टर महादेव विभुते यांना मोठी संधी देण्यात आली आहे. या तिरंगी लढतीमध्ये तिन्ही बलांडे व अभ्यासू व्यक्ती असून यामध्ये जनता कोणाला मत देईल हे मात्र पुढील काही दिवसांमध्ये चित्र स्पष्ट होणार अशी चर्चा मात्र मतदारसंघात होताना दिसून येत आहे.

         सदर निवडणुकीमध्ये मराठा समाजाचे मताधिक्य हे मोठ्या प्रमाणात असून यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर लिंगायत समाजाचे माताधिक्य आहे तर तिसऱ्या क्रमांकावर मातंग समाज आणि बौद्ध समाज यांची मताधिक्य असल्याने याच मताधिक्याच्या जोरावर आपला उमेदवार कोण हे मतदार संघातील जनता ठरवणार आहे. यामध्ये लिंगायत समाजामध्ये आणि मातंग समाजामध्ये आमदार राजेश पवार यांच्या विषयाची मोठी नाराजी असल्याचे देखील सांगण्यात येत असून आणि मराठा समाजाकडून देखील आरक्षणाविषयी प्रश्न विधानसभेमध्ये मांडत नसल्याची खंत मराठा समाजाकडून व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे नेमकं कोणाला संधी मिळेल याचीच चर्चा मतदारसंघात होताना दिसून येत आहे. आज दोन दिग्गज आणि उमेदवारी माघार घेतल्याने याचाच निश्चितपणे फायदा काँग्रेस महाविकास आघाडीला होणार अशा चर्चा मात्र जोर धरत आहे. कारण यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शिरीष देशमुख गोरठेकर यांचा मतदारसंघांमध्ये दांडगा जनसंपर्क असून आणि त्यांच्याच असलेल्या मताधिक्यामुळे काँग्रेस महाविकास आघाडीला निश्चित फायदा होईल असा विश्वास काँग्रेस महाविकास आघाडी कार्यकर्ते यांच्याकडून सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे शिवराज पाटील होटाळकर यांनी देखील उमेदवारी माघार घेतल्याने मराठा समाजाचे मताधिक्य हे काँग्रेसच्या पारड्यामध्ये पडण्याची दाट शक्यता मानली जात आहे. यामुळे नायगाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाकडून एका महिलेचा सन्मान राखत उमेदवारी दिली आहे. याच उमेदवारीच्या जोरावर डॉक्टर मीनलताई खतगावकर यांचा विजय निश्चित मानला जात आहे. अशी चर्चा होताना दिसून येत आहे. मात्र वंचित बहुजन आघाडी चे फॅक्टर कितपत बाजी मारेल याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागून आहे. कारण लिंगायत समाजाचे मताधिके हे मतदारसंघात मोठ्या प्रमाणात असल्याने लिंगायत समाजाकडून डॉक्टर माधव विभुते यांना मिळण्याची शक्यता असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. करण लिंगायत समाज व दलित समाज यांचे मताधिक्य एकत्र केल्यास वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार देखील या निवडणुकीमध्ये बाजी मारण्याची शक्यता असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. म्हणून या निवडणुकीमध्ये मोठी चुरस पाहायला मिळणार आहे

Share This Article
error: Content is protected !!