नायगाव विधानसभा मतदारसंघात वंचितचे डॉ. माधव विभुते यांनाच निवडून देणार —- जनतेचे मत.

abhishek bakkewad
4 Min Read
Spread the love

नायगाव प्रतिनिधी अशोक वाघमारे.

नायगाव – राज्यसह नांदेड जिल्ह्याचे लक्ष असलेल्या नायगाव विधानसभा मतदारसंघ हा बहुचर्चेत असून या मतदारसंघांमध्ये चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. तर याच मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाने देखील उडी घेतल्याने हि निवडणुड चूरशीची होणार हे चित्र स्पष्ट दिसून येते आहे. 

     नायगाव विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची निवडणूक हि अतिशय चूरशीची व धनशक्ती विरुद्ध जनशक्ती होणार कारण या निवडणुकीत धांनदांगड्या, व घराणेशाहीतून आलेल्या उमेदवारांना मतदार संघातील जनता चांगलाच धडा शिकवतील असा विश्वास नायगाव मतदार संघातील बहुसंख्य जनतेला असल्याचे दिसून येत आहे.अर्थात मतदारांना घराणेशाही मुळात मान्य नाही याचाच फटका बसण्याची शक्यता मानली जात आहे. 

     म्हणून नायगाव विधानसभा मतदार संघात वंचित बहुजन आघाडी कडून डॉ माधव विभुते यांना संधी देऊन मतदार संघातील दलित व बहुजन समाजाची वज्रमुट बांधण्याचा मुख्य होतु ठेऊन त्यांना उमेदवारी देण्यात आल्याची चर्चा होताना दिसून येते आहे. आणि डॉ विभुते हे लिंगायत समाजातून असून ते गेले अनेक वर्षांपासून परी हास्पिटल च्या माध्यमातून जनसेवेचे काम अविरत पणे करत असल्याने त्यातून डॉ. विभुते यांची मतदार संघात मोठी ओळख आहे. आणि जनसंपर्क देखील आहे. डॉ. माधव विभुते हे अतिशय सामान्य कुठुम्बातून पुढे आले असून ते अतिशय कठीण परिस्थिती वर मात करून जीवनाचा सर व दारिद्राच्या भयाण कच्याट्यातून स्वतःचे नशीब आजमाहून येशाचे शिखर गाठेपर्यंत कधी न थांबलेले आणि जीवनात कधी हि अपयेशाच व परिस्थिती च दुःख समाजाला न सांगता मोठ्या जिद्धीने व चिकाटीने यश प्राप्त करून जनसेवा करण्याचा निश्चय मनाशी बाळगून आणि जनकल्याणकारिता जनसेवा करण्यासाठी स्वतःच जीवन वाहून घेण्याऱ्या नेतृत्वाला नायगाव विधानसभा मतदारसंघाची निश्चित पणे सेवा करण्यासाठी जनसेवकाला सुज्ञ मतदारसंधी देतील एवढा विश्वास जनतेत असल्याचे देखील दिसून येते आहे. 

नायगाव विधानसभा मतदार संघात काँग्रेस – महाविकास आघाडीकडून डॉ. मिनलताई खतगांवकर यांची निशाणी हाताचा पंजा , भाजपा – महायु्तीकडून राजेश पवार यांची निशाणी कमल, तर वंचित आघाडी कडून डॉ. माधव विभुते यांची निशाणी गॅस सिलेंडर, आणि राज्यात नव्याने निर्माण झालेली तिसरी आघाडी म्हणून प्रहार जनशक्ती – परिवर्तन महाशक्ती चे गजानन चव्हाण यांची निशाणी बॅट, तर शेतकरी कामगार पक्षाकडून अर्चना विठ्ठल गवळी हे सामाजिक कार्यात मोठी ओळख असल्याने त्यांनी देखील मोठी ताकदीशी लढण्याचा चंग बांधला आहे. म्हणून त्यांची निशाणी ऊसतोड आहे, तर अपक्ष म्हणून मातंग समाजाचे नेते गंगाधर कोत्तेवार यांची निशाणी ऑटो रिक्षा आहे, अन्य काही मिळून सदर निवडणूक रिंगणात 10 उमेदवारांनी आपले नशीब अजमावत आहे. तर यामध्ये डॉ.विभुते वाढत चालेला जनसंपर्क पाहता दलित, obc, व मुस्लिम, मराठा समाजाचा चांगलाच प्रतिसाद मिळत असल्याने मतदार संघात मोठे आव्हाहन उभे केल्याचे सांगण्यात येते आहे. या निवडणुकीत खरोखर जनता डॉ. विभुते यांना मतदार संघांचे काम करण्यासाठी विधानसभेत पाठविलं का? असा प्रकारची चर्चा होताना दिसून येते आहे.

नायगाव विधानसभा मतदार संघात प्रमुख लढत हि काँग्रेस, भाजपा, वंचित, आणि प्रहार, शेतकरी पक्षात जरी होत असली तरी यात आमदार राजेश पवार यांच्या विषयी मतदारात जातीय, सामाजिक, द्वेष पसरून जाती जातीत तेढ, विकासाच्या नावाखाली नातेवाईक, सच्च्या कार्यकर्त्याला रस्त्याचे, नाली चे, पाण्याचे कंत्राट देऊन निकृष्ठ व दर्जाहीन कामे झाले आहेत तरी देखील आशा भ्रष्ट कार्यकर्ते यांना पाठीशी घातल्याने, व एक कलमी कार्यक्रमाची पद्धत यामुळे , मतदारात तीव्र नाराजी असल्याने याचाच फायदा काँग्रेस, व वंचित ला होण्याची दाट शक्यता मानली जात आहे.

Share This Article
error: Content is protected !!