उमेदवारांनी निवडणूक खर्चात सुसूत्रता ठेवावी-ऐ .गोविंदराज यांचे आवाहन

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

 देगलूर- विधानसभा उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची तिसरी तपासणी पूर्ण 

देगलूर  प्रतिनिधी नागेश पलपवार,

देगलूर – विधानसभा निवडणुकीत उमेदवारानी खर्चामधे सुसूत्रता ठेवावी असे आवाहन विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४कार्यक्रम अंतर्गत ९०-देगलूर मतदार संघातील निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचा निवडणूक खर्च संनियंत्रणाच्या अनुषंगाने उमेदवारांनी दाखल करावयाच्या दैनंदिन खर्चाच्या नोंद वहीची तिसरी तपासणी दि.१५ नोव्हेंबर शुक्रवार रोजी पार पडली.या वेळी

खर्च निरीक्षक ऐ. गोविंदराज उमेदवाराना संबोधित करीत होते. सहाय्यक निवडणूक खर्च निरीक्षक परमेश्वर माळी व

सोबत कार्यकारी अभियंता गंगथडे उपस्थित होते.

मा.गोविंदराज यांच्या अध्यक्षतेखाली सदरील तिसरी तपासणी येथील देगलूर तहसीलदार यांच्या कक्षात दि.१५ नोव्हेंबर शुक्रवार रोजी झाली. त्यांनी प्रत्येक उमेदवारांना व्यवहारात सुसूत्रता ठेवावी .तसेच जाहिरात, वाहतूक, प्रचार साधन साहित्य व इतर यावरील खर्चा बाबतचा आढावा घेऊन तपासणी केली 

 मतदारसंघातील उमेदवारांची खर्च निरीक्षक यांच्यासमोर भारत निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ च्या कलम ७७ नुसार निवडणुकीच्या वेळेस प्रत्येक उमेदवार अथवा निवडणूक प्रतिनिधी द्वारे त्याला /तिला नामनिर्देशित करण्यात आले आहे त्या दिनांकापासून निवडणुकीच्या निकाल लागणाऱ्या दिनांका पर्यंत दोन्ही दिनांक धरून त्यांनी किंवा त्यांच्या निवडणूक प्रतिनिधीने केलेला किंवा प्राधिकृत केलेल्या सर्व खर्चाचा स्वतंत्र तसेच अचूक हिशोब ठेवणे आवश्यक आहे. आयोगाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची आता मतदान व निकाल प्रक्रिया पार पडे पर्यंत ठेवावी अशा सुचना देण्यात आल्या 

 सदर वेळेस अनुपस्थित राहणारे उमेदवारांना भारत निवडणूक आयोगाकडून निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार कार्यवाहीस पात्र असणार आहेत .

कायद्याचे आवश्यकतांचे अनुपालन करण्यास निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने कसूर केल्यास लोकप्रतिनिधित्व अधिनियम १५५१ कलम १०क अन्वये निवडणूक आयोगाकडून कार्यवाही करण्यात येईल असे ही यावेळी गोविंदराज निवडणूक खर्च निरीक्षकांनी सूचीत केले.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती क्रांती डोंबे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी भरत सूर्यवंशी,सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गजानन शिंदे , 

खर्च नोडल अधिकारी, पथक प्रमुख तथा उपकोषागार अधिकारी एस. एस. रामोड, खर्च पथक प्रमुख तथा नोडल अधिकारी मनोहर ढेंगळे, तथा मिडीया कक्षाचे प्रतिनिधी महेश कुलकर्णी, विठ्ठल चंदनकर, विजय शिकारे, ९०-देगलूर विधानसभा मतदारसंघ विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ यांनी माहीती दिली.

Share This Article
error: Content is protected !!