या सभेला हजारोंच्या संखेने उपस्थीत राहण्याचे आव्हाहन…
प्रतिनिधी/माधव काईतवाड
हिमायतनगर:-शहरातील बसस्थानक परिसरात दि.18/11/2024 रोजी सकाळी ठिक 10.30 वाजता. 84-हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदार संघाचे वंचीत बहुजन आघाडीचे व ओबीसी,एसी,एसटी, आरक्षण बचाव साठीचे अधिकृत उमेदवार
दिलीप आला राठोड यांच्या निवडणूक प्रचारार्थ प्रा.लक्ष्मण हाके सर यांची जाहिर सभा होणार आहे.या सभेला यांच्या सोबत प्रमुख मान्यवर म्हणुन ओबीसी संघर्ष योध्दा.नवनाथ आबा वाघमारे,वंचीत बहुजन आघाडीचे नांदेड जिल्हा पक्ष निरीक्षक ॲड.सर्वजीत बनसोडे,वंचीत बहुजन आघाडी चे जिल्हा अध्यक्ष हत्ती अंभीरे, हिमायतनगर ओबीसी ता.अध्यक्ष बाबाराव जरगेवाड,ओबीसी हदगाव ता.अध्यक्ष नाना गुडेट्टवार यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर सभा होणार आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की.
हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदार संघात गेली अनेक दशकांपासून घराणेशाही व प्रस्थापीत राजकारण आहे.यात फक्त आपल्या अठरा पगड समाजाचे फक्त मतदानापुरता वापर करुन हे प्रस्थापीत स्वत: ची पोळी भाजुन
आपल्या गोर गरीबांना विकासापासुन कोसो दुर ठेवले आहेत. आपल्या समाजाला अंधारातुन बाहेर काढण्यासाठी व आपला हक्क मिळवण्यासाठी ओबीसी चा वंचीत बहुजन आघाडीने आपल्याला उच्च शिक्षीत उमेदवार दिला.
यांच्याच प्रचारार्थ या जाहिर सभेचे प्रमुख वक्ते म्हणुन ओबीसी योध्दा प्रा.लक्ष्मण हाके यांची सभा होणार असल्याचे ओबीसी तालुका अध्यक्ष यांनी लोकतंत्र न्युज शी बोलतांना म्हणाले.यावेळी त्यांनी ओबीसी,एससी,एसटी,
समाजबांधवाना या सभेस उपस्थीत राहण्यासाठी आव्हाहन केले आहे