मुंबई – विधानसभेच्या निवडणुकीचं मतदान २० नोव्हेंबर रोजी झालं. आता निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. त्यामुळे या निकालाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. महाराष्ट्रात कोणत्या पक्षाचं सरकार येणार? महाविकास आघाडी की महायुतीचं सरकार येणार? याबाबत राजकीय नेत्यांकडून वेगवेगळे दावे करण्यात येत आहेत.
विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत. त्यामध्ये काही एक्झिट पोलच्या अंदाजानुसार महायुतीला जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे, तर महाविकास आघाडीला कमी जागा मिळण्याचा अंदाज आहे. मात्र, असं असलं तरी निकाल समोर आल्यानंतरच कोणाला किती जागा मिळतात? हे स्पष्ट होईल.