धर्माबाद तालुक्यातील बन्नाळी पुनर्वसन समस्या सोडवण्यास मी कटीबध…मा.प्रा.रविंद्र वसंतराव चव्हाण

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

 

ना.मदत व पुनर्वसन मंत्री मा. ना. अनिल पाटील यांची घेतली भेट

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड : नायगाव विधानसभा मतदारसंघातील धर्माबाद तालुक्यातील बन्नाळी ह्या गावात सततच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात गावात पुराचे पाणी शिरले त्यामुळे संपूर्ण गावकऱ्यांना पुराच्या पावसाचा त्रास होत आहे.

महाराष्ट्र राज्याचे मा.मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या आदेशानुसार नायगाव विधानसभा मतदारसंघाचे युवा नेते धर्माबाद तालुक्याचे प्रभारी प्रा.रविंद्र वसंतराव चव्हाण यांनी जातीने लक्ष घालून हा प्रश्न सोडवला आहे.

बन्नाळी नगरीचे सरपंच व त्यांच्या सर्व व सर्व युवक वर्ग यांच्यासह मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील साहेब यांची आज भेट घेतली व समस्या त्वरित सोडून द्यावी अशी विनंती केली

मा.मंत्री महोदय नामदार अनिल पाटील साहेब यांनी सकारात्मक चर्चा करून जिल्हाधिकारी साहेबांची त्वरित मीटिंग लावण्याच्या शासन स्तरावर सूचना दिल्या आहेत.

यावेळी लक्ष्मणराव निदानकर (सरपंच बनाळी ) साईनाथ पाटील चपळे,नाविनकुमार पाटील,यौगेश जायशेटे,श्रीधर करे.उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

Share This Article
error: Content is protected !!