सोन्याबाई ठक्करवाड माध्यमिक विद्यालयाचे यशाची परंपरा कायम; यंदाही दहावीचा निकाल १०० टक्के

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

कुंडलवाडी (बिलोली लक्षमण जमलवाड) : हुनगुंदा येथील सोन्याबाई ठक्करवाड विद्यालय यशाची परंपरा कायम ठेवत यंदाही दहावीचा निकाल १०० टक्के लागला असून विशेष प्राविण्यात १० तर प्रथम श्रेणीत २०, द्वितीय श्रेणीत १५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

यात कु. लिमशट्टे सुजाता दिगांबर ९० टक्के घेऊन विद्यालयातून पहिला क्रमांक मिळविले आहे. तर कु. शिवशेट्टे शिवानी माधव ८१.४० टक्के घेऊन द्वितीय, कु. लखपती वैष्णवी देविदास ७९.४० टक्के घेऊन विद्यालयातून तृतीय क्रमांक मिळविले आहे. तर इळगे लोकेश हानमंतराव ७८.८० कवडेकर निकिता रामा ७८.२० गायकवाड संपदा शेषेराव ७५.८० शिंदे ओमकार गंगाधर ७५.४० दिंडे विशाल शंकर ७५ टक्के, साखरे अंकिता साईनाथ ७५ टक्के, कवडेकर सविता रमेश ७४.४० लखपती अंकिता मारुती ७४ टक्के, भाले रितेश शाम राव ७४ टक्के, शिंदे साधना दिलीप ७२.४० असे गुण मिळविले आहे. या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार गंगाराम जी ठक्करवाड, संस्थेचे संचालक तथा माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मणराव ठक्करवाड, विद्यालयाचे मुख्याध्यापक बी. बी. जिंकले, सहशिक्षक डी. एस. बोडके, सौ. एम. डी. सोमवंशी, बी. एस. गुरुडे, सौ. एस. डी. देगावे, यू.व्ही. भाले, एम. एन. आकुलवार, एन. जी. लोलापोड, एस. एस. म्याकलवार, आर. एम. म्याकलोड आदींनी अभिनंदन केले आहे.

TAGGED:
Share This Article
error: Content is protected !!