महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीच्या’ महामार्गाला मंजुरी, अंदाजे ८५ हजार कोटी रुपये खर्च..

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

शक्तिपीठ महामार्ग 12 जिल्ह्यांमधून जाणार आहे.

मुंबई – एकीकडे समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे तर दुसरीकडे समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर प्रस्तावित करण्यात आलेल्या एका महामार्ग प्रकल्पाच्या कामाला फडणवीस सरकारने मंजुरी दिलेली आहे. मंडळी समृद्धीच्या धर्तीवर नागपूर ते गोवा दरम्यान शक्तीपीठ महामार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे.

नागपूर ते गोवा असा ८०५ किमीचा आणि अंदाजे ८५ हजार कोटी रुपये खर्चाचा शक्तिपीठ महामार्ग बांधण्यात येणार आहे. हा महामार्ग 12 जिल्ह्यांमधून जाणार आहे. सध्या नागपूर ते गोवा यादरम्यान प्रवास करण्यासाठी प्रवाशांना २० ते २२ तासांचा वेळ लागतो मात्र जेव्हा हा महामार्ग प्रकल्प पूर्ण होईल तेव्हा हा प्रवासाचा कालावधी अवघ्या दहा तासांवर येण्याची शक्यता आहे.

म्हणजेच या प्रकल्पामुळे नागपूर ते गोवा दरम्यान चा प्रवास सुसाट होणार असून राज्याच्या एकात्मिक विकासासाठी हा प्रकल्प गेम चेंजर ठरण्याची शक्यता आहे. समृद्धी महामार्गामुळे ज्याप्रमाणे विदर्भातील जिल्ह्यांचा विकास होत आहे त्याचप्रमाणे शक्तिपीठ महामार्गामुळे मराठवाड्यातील जिल्ह्यांचा विकास होणार असा आशावाद माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून व्यक्त होतोय.

खरंतर शक्तिपीठ महामार्ग लोकसभा निवडणुकीत चर्चेचा मुद्दा राहिला आणि या प्रकल्पामुळेच लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यातील महायुतीचे अनेक नेते पराभूत झालेत. म्हणूनचं विधानसभा निवडणुकीच्या आधी शक्तीपीठ महामार्गासाठी भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला.

TAGGED:
Share This Article
error: Content is protected !!