महाराष्ट्रात काँग्रेसला मिळणार नवा प्रदेशाध्यक्ष…

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

काँग्रेस पक्षांतर्गत राजकीय हालचालींना वेग..

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या चर्चा सुरू आहेत. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. 101 जागा लढवून काँग्रेसला केवळ १६ जागा जिंकता आल्या.

या पराभवानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत आपल्या पदाचा राजीनामा देण्याची तयारी दाखवली. पण वरिष्ठांकडून त्यांना पदावर कायम राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. या घडामोडीनंतर आता काँग्रेस पक्षांतर्गत राजकीय हालचालींना वेग आला आहे.

    महाराष्ट्र काँग्रेसमध्ये नवा प्रदेशाध्यक्ष मिळण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. वरिष्ठांकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला पसंती दिल्याची माहिती आहे. या अनुषंगाने आता पृथ्वीराज चव्हाण दिल्लीला देखील रवाना झाले आहेत. त्यामुळे पुढच्या काही दिवसांत महाराष्ट्र काँग्रेसमध्ये नेतृत्व बदल झाल्याचं दिसू शकतं, अशी माहिती आहे.

   काँग्रेसचा नवा प्रदेशाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्रातील होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. पुढील दोन ते तीन दिवसात काँग्रेसची दिल्लीत याबाबतची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत प्रदेशाध्यक्षांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकतं.

   मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष पद हे पश्चिम महाराष्ट्रात मिळणार असून वरिष्ठांकडून सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेस हाय कमांडकडून दिल्लीला तत्काळ बोलावलं आहे. पृथ्वीराज चव्हाण यांना प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

TAGGED:
Share This Article
error: Content is protected !!