डॉ. संजीवकुमार जाधव यांची उपसंचालक आरोग्य सेवा (शहरी) मुंबई येथे पदस्थापना

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

नांदेड प्रतिनिधी/

नांदेड : जिल्ह्यातील उमरी येथील भूमिपुत्र प्रसिद्ध डॉक्टर व सर्जन डॉ. मनोहरराव जाधव यांचे सुपुत्र लहान पणापासूनच वैद्यकीय वारसा व अनुभव आलेला डॉ संजीवकुमार जाधव यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण करुन वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, निवासी वैद्यकीय अधिकारी व सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी या विविध पदावर काम केले. सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (हत्तीरोग) महाराष्ट्र राज्य या पदावर कार्यरत असताना त्यांनी महाराष्ट्रातील अंडवृध्दि रुग्ण यांची शस्त्रक्रिया करण्यासाठी जिल्हा, तालुका स्तरावर शिबीर आयोजित करून मोठया प्रमाणात अंडवृध्दि शस्त्रक्रिया करण्यात आले. तसेच सह संपादक आरोग्य पत्रिका,महाराष्ट्र राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग पुणे येथे कार्यरत असताना विविध आजार व रोग यांची माहिती प्रकाशित केली. सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (अंधत्व नियंत्रण, मानसिक आरोग्य व तंबाखू नियंत्रण कार्यक्रम) मुंबई अशा विविध पदावर आरोग्य विभागात काम केले. त्यांची नुकतीच महाराष्ट्र शासनाने उपसंचालक आरोग्य सेवा (शहरी) मुंबई येथे पदस्थापना दिली आहे.

त्यांचा नवीन पदस्थापना बदल डॉ.निळकंठ भोसीकर जिल्हा शल्य चिकित्सक नांदेड, डॉ.बालाजी शिंदे जिल्हा आरोग्य अधिकारी नांदेड, महेंद्र जगताप राज्य किटक शास्त्रज्ञ पुणे, डॉ.आकाश देशमुख जिल्हा हिवताप व हत्तीरोग अधिकारी नांदेड, शिरीष देशमुख गोरठेकर, अशोक मामीडवार राज्याध्यक्ष क्ष किरण वैज्ञानिक अधिकारी, माधव शिंदे राज्य पदाधिकारी औषध निर्माण अधिकारी, गजानन श्रीरामवार माजी नगरसेवक व भाजपा नेते, सत्यजीत टिप्रेसवार राज्य पदाधिकारी महाराष्ट्र राज्य हिवताप कर्मचारी संघटना, गोपाळ राठौर, पत्रकार नरेंद्र येरावार, लक्ष्मीकांत देशमुख, गिरीश सपकाळ, स दा काळे पुणे, महेंद्र वाघमारे जालना व उमरीवासी कडून पुढील आरोग्य विषयक कार्यास शुभेच्छा देण्यात आले.

Share This Article
error: Content is protected !!