नायगाव तालुक्यात 18 परीक्षा केंद्रावर 2539 विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्ती परीक्षा…! 

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

नायगाव / प्रतिनिधी  अशोक वाघमारे

नांदेड – दि.9 फेब्रुवारी 2025 रोजी नायगाव तालुक्यातील पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5 वी साठी 11 परीक्षा केंद्रावर परीक्षेस आवेदनपत्र भरलेल्या 1420 विद्यार्थ्यांपैकी 1374 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती इ.8 वी परीक्षेसाठी 1198 पैकी 1165 विद्यार्थ्यांनी 7 परीक्षा केंद्रावर परीक्षा दिली.सर्व परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी गट शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून नियोजन करण्यात आले होते.प्रत्येक केंद्रावर भेटी देण्यासाठी भरारी पथके स्थापन करण्यात आली होती.गट शिक्षणाधिकारी श्री संग्राम कांबळे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोमठाना व शंकरराव चव्हाण हायस्कूल कोलंबी या केंद्रांना भेटी दिल्या.परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी तालुका परीक्षा समन्वयक म्हणून श्री प्रशांत सोनटक्के , सर्व विशेष शिक्षक, विशेष तज्ज्ञ व विषय साधनव्यक्ती यांनी परिश्रम घेतले.व सुरळीत पार पडली.

Share This Article
error: Content is protected !!