नायगाव / प्रतिनिधी अशोक वाघमारे
तालुका दक्षता समिती नायगाव अध्यक्षा तथा तहसीलदार तहसील कार्यालय नायगाव यांच्या अध्यक्षतेखाली इयत्ता 12 वी फेब्रुवारी / मार्च 2025 परीक्षा संदर्भात दक्षता समिती ची बैठक तहसील कार्यालय नायगाव येथे 5 फेबूरवारी रोजी संपन्न झाली.
यामध्ये राज्यशासनाच्या शिक्षण विभागाच्या 100 दिवसांच्या कृती आराखड्यातील मुद्द्यानुसार इयत्ता 10 वी / 12 वी फेब्रुवारी/मार्च 2025 च्या परीक्षा कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरणात पार पडतील यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी.
परिरक्षक कार्यालय, नायगाव अंतर्गत येणाऱ्या सर्व परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरळीतपणे पार पडेल, कोणत्याही गैर मार्गाचा अवलंब होणार नाही यासाठी महसूल प्रशासन, पंचायत समिती विभाग, शिक्षण विभाग यांच्या समन्वयातून बैठे पथक, भरारी पथक यांचे नियोजन करण्यात येईल.
परीक्षे दरम्यान परीक्षा केंद्र असलेल्या परिसरात व गावात झेरॉक्स सेंटर सुरू असणार नाही. असल्यास झेरॉक्स सेंटरला सील करण्यात येईल.
पर्यवेक्षकांची नियुक्ती केंद्र बदलून मिळणार. दिलेल्या परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षक पूर्ण वेळ उपस्थित राहून केंद्र संचालकास सहकार्य करतील. पर्यवेक्षक उशिरा आल्यास किंवा अनुपस्थित असल्यास त्यांच्यावर कायदेशीर रित्या कारवाई प्रस्तावित करण्यात येईल. सर्व केंद्रसंचालक यांनी परीक्षा केंद्रावर दालन व्यवस्था, बैठक व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पुरेपुर असल्याची खात्री करण्यात यावी. अशा सूचना मा. श्रीमती धम्मप्रिया गायकवाड (तहसीलदार, नायगाव) यांनी बैठकीदरम्यान दिल्या.
तालुका दक्षता समितीच्या बैठकीत मा. गटविकास अधिकारी लक्ष्मण वाजे (पंचायत समिती नायगाव), मा. संग्राम कांबळे, (गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती, नायगाव), परिरक्षक श्री आनंद रेनगुंटवार व इयत्ता 12 वी परीक्षा केंद्राचे सर्व केंद्र संचालक उपस्थित होते.