नागपूर जिल्हा प्रतिनिधी/
नागपूर – नागपूरमध्ये सोमवारी मोठा हिंसाचार झाला, जमावाने आक्रमक होत दगडफेक केली, तोडफोड केली, पेट्रोल बॉम्बही फेकले. यात कोट्यवधींचे नुकसान झाले. या हिसांचारानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पहिल्यांदाच नागपूरमध्ये आले, वरिष्ठ पोलीस आयुक्तांशी बैठक घेत त्यांनी सर्व आढावा घेतला.
त्यानंतर माध्यमांशी संवाद साधाताना त्यांनी प्रतिक्रिया दिली. दंगा करणाऱ्या प्रत्येकावर कारवाई होणार. कारवाई होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला. या हिंसाचारात ज्यांचं नुकसान झालं त्यांना 3 ते 4 दिवसांत नुकसान भरपाई दिली जाईल. आत्ता जे काही नुकसान झालेलं आहे ते सगळं मुकसान दंगेखोरांकडून वसूल करण्यात येईल, दंगेखोरांनी ते पैसे भरले नाहीत तर त्यांची प्रॉपर्टी विकली जाईल असा थेट इशारा देत फडणवीसांनी आक्रमक भूमिका घेतली.