हिमायतनगर ता.प्रतिनिधी/जरगेवाड बाबाराव
हिमायतनगर : तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष पदी संजय माने यांची फेर निवड करण्यात आली आहे.
संजय माने हे विद्यमान आमदार माधवरावजी पाटील जवळगावकर यांचे अत्यंत विश्वासू व पक्षांशी एकनिष्ठ आसणारे कार्यकर्ते आहेत.
त्यांच्या कडे यापूर्वी शहर अध्यक्ष पदाची धूरा होती .
संजय माने यांच्या कामाची दखल घेता, ता. अध्यक्ष पदाची निवड जवळपास निश्चित झाली होती. .परंतु आमचे नेते जी जबाबदारी देतील ती आम्ही स्विकारू आसी ग्वाही संजय माने यांनी दिली.
आणि आज दि 22रोजी नांदेड येथील निवडीचा कार्यक्रम अंतर्गत संजय माने यांना माधवराव पाटील जवळगावकर यांचा नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष यांनी संजय माने यांची काँग्रेस पक्षाचे हिमायतनगर शहराध्यक्ष पदी फेर निवड केली आहे .
येणाऱ्या काळात मि आपल्या पक्षांशी एकनिष्ठ राहून प्रत्येक निवडणुकीत माझ्या पक्षाची सत्ता खेचून आणण्याचा प्रयत्न करीन असे नवनिर्वाचित शहर अध्यक्ष संजय माने यांनी लोकतंत्र न्युज लाईव्ह ला प्रतिक्रिया दिली आहे.